कोविड रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटल सज्ज
सिव्हिल हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र
आरोग्य सुविधेमुळे जीवित हानी होणार नाही आमदार, खासदार यांचे मत
अहमदनगर प्रतिनिधी : खा.डॉ. सुजय विखे पाटील व शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटल ची संयुक्त पाणी केली केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवलीआहे यासाठी सिविल हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे केंद्र सरकारने 19 कोटी रुपये सिव्हिल हॉस्पिटलच्या आरोग्य सुविधेसाठी दिले होते त्यासाठी आमदार, खासदार यांनी पाठपुरावा केला. शंभर बेडचे आय.सी.यू सेन्टर तयार असून यामधील 40 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नगरचे आय.सी.यू सेन्टर तयार झाले आहे कोविडची लाट येणार नाही परंतु ती दुर्दैवाने आली तर आपण सर्वजण सज्ज आहोत सिविल हॉस्पिटलचे आय.सी.यू सेन्टरची जळीत घटना दुर्दैवी व नैसर्गिक होती आपण त्यातून खूप काही शिकलो आणि ती घटना परत होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की – कोविडच्या दोन्ही लाटे मध्ये नागरिकांची दुर्दैवी मोठी जीवित हानी झाली होती मात्र आत्ता येणाऱ्या कोविडच्या लाटेमध्ये जीवित हानी होणार नाही सर्व आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तरी नगर जिल्हा सज्ज झाला आहे आता कोविड सेंटरची गरज आपल्याला पडणार नाही सिव्हिल हॉस्पिटलचे आय.सी.यू सेंटर सज्ज झाले आहे आरोग्य सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले