खा.लंके यांच्या भागिनीने,कर्तुत्ववान भावाचा सामाजिक वसा जतन करत राबवला अनोखा उपक्रम !
जि.प.प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करत घडविले सामाजिकतेचे दर्शन !
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार निलेश लंके यांच्या परोपकारी व सामाजिक कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले खासदार लंके यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक व शासकीय मदत पोहोचवीण्याचा नेहमीच असणारा प्रयत्न पाहता,अनेक सामाजिक संस्था या खासदार लंके यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्य करताना दिसत आहे.म्हणतात ना दातृत्व हे रक्तातच असावे लागते त्याच प्रमाणे खासदार लेंके यांची ज्येष्ठ भगिनी सौ.वंदना सतीश गंधाक्ते यांनी शुक्रवारी त्यांचा नातु कु.निल श्रीकांत गंधाक्ते याच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटत करत आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा केला .
शिरूर नगरपरिषद शाळा सेंटर येथे कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन करून करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थांना मार्गदर्शन केले.आपल्या भाषणात बोलताना सौ.राणी लंके यांनी आपल्या खासदार पतीचे उदाहरण देत सांगितले की,बुके,शाल या सारख्या किमती वस्तू विकत घेऊन सत्कार करण्यापेक्षा व आपल्या लाडक्या मुला मुलींचा वाढदिवस खर्च करून साजरा करण्यापेक्षा, अवांतर खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत तो खर्च सामान्य जनतेसाठी वापरला तर तो वाढदिवस असो की इतर कुठलेही शुभ कार्य असो ते समाधानकारक ठरते. सत्काराच्या रकमेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले तर त्याचा उपयोग गरजु मुलांना निश्चित चांगला होईल. आसे सांगत त्यांनी उपस्थितांच्या वतीने व पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील आम जनतेच्या वतीने कु.निल ला वाढदिवसाच्या शुभेच्छा रूपी अशिर्वाद दिला.
त्या नंतर कु.निल चा जि.प.शाळेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटत करण्यात आले.अकस्मात झालेल्या या समारंभामुळे शाळेतील चिमुकले ही भारावून जात आनंदीत झाले.समाजात अनेक श्रीमंत लोक आहेत,ते खूप खर्च करून वाढदिवस साजरे करतात,पण गरजूंना मदत करत नाही.परंतु प्रत्येकाने जसे जमेल तसे सहकार्य करत सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे,आसे सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई गंधाक्ते यांनी त्यांचा नातू कु.निल याचा वाढदिवस हा बाल विद्यार्थ्यांमध्ये साजरा करत समाजात एक वेगळा सामाजीक संदेश दिला आहे .
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई लंके, सामाजिक कार्यकर्त्या सौ. वंदना गंधाक्ते,रामलिंग महिला पतसंस्थेचे चेअरमन सौ.राणी कर्डिले,छाया गंधाक्ते,शोभना पाचंगे,सुनीता घावटे,राणी शिंदे,सुरेखा कौठावळे,ऐश्वर्या ढोरसकर,प्रांजल गंधाक्ते,किशोरी गावडे,वैशाली साखरे,सतिष गंधाक्ते ,विनोद घावटे,श्रीकांत गंधाक्ते,प्रशांत रत्नपारखी,किसन कौठावळे,प्रणय गंधाक्ते,दादा पठारे,गावडे गुरुजी,शाळेचे सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्यासह लंके व गंधाक्ते परिवारावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून कु.नीलला शुभेच्छा रुपी शुभाशिर्वाद दिले.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्षा सौ.राणी कर्डिले यांनी केले तर आभार धुमाळ मॅडम यांनी मानले.