आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर येथे आर्थिक मदत

- Advertisement -

आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर येथे आर्थिक मदत

गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे – गणेश बारस्कर 

नगर : तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे या काळामध्ये सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने पुढे येऊन गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक उपक्रम राबवावेत, लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर येथील शाळा खोल्यांना कलर देण्यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर मित्र मंडळ परिवाराच्या वतीने २५ हजार रुपयाची आर्थिक मदत केली असल्याची माहिती गणेश बारस्कर यांनी दिली.

निर्मल नगर येथील लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर शाळेला आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर मित्र मंडळ परिवाराच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांच्याकडे सुपूर्द करताना गणेश बारस्कर समवेत अमोल दंडवते, मुंजाभाऊ देशमुख, किरण गायकवाड, किरण भिंगारदिवे, विजय दंडवते, अमोल बारस्कर, सागर दंडवते, वैभव आडोळे, शकील तांबोळी, गणेश आव्हाड, साहिल शिंदे, सुशील शिंदे, शिक्षक वर्ग मंजुळा नवगिरे, संजोत बर्वे, मंदाकिनी पांडुळे, आशा धामणे, ज्योती पवार, राणी राऊत आदी उपस्थित होते.

संपत बारस्कर मित्र मंडळ परिवाराच्या वतीने शाळेला आर्थिक मदत केल्याबद्दल मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!