गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत आमदार जगताप यांच्याकडे सुपुर्द
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात येणारे शैक्षणिक साहित्याची मदत आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करुन ग्रुपच्या महिलांनी शैक्षणिक साहित्याची मदत दिली.
यावेळी नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा कुसुम सिंग, उपाध्यक्षा उषा सोनी, खजिनदार मेघना मुनोत, ज्योती गांधी, मनीषा देवकर, रजनी भंडारी, उषा सोनटक्के, जयश्री पुरोहित, सुजाता पुजारी, हिरा शहापुरे, लता डेंगळे, माया राजहंस, जीवनलता पोखरणा, आशा गायकवाड आदी उपस्थित होत्या.
जयाताई गायकवाड म्हणाल्या की, शहराला विकासात्मक दिशा देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. विकास साधत असताना सर्वांना बरोबर घेऊन शेवटच्या घटकाचा विचार करुन त्यांचे कार्य सुरु आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन त्यांची सुरु असलेली वाटचाल ही विकासाकडे घेऊन जाणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, आमदार जगताप यांनी नेहमीच गरजू घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्या विकासात्मक दृष्टीकोनाने शहराचा विकास साधला जाऊन खेड्याची ओळख पुसली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.