अहमदनगर प्रतिनिधी – गावठी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद करण्यात आले.
काल दि .२ ९ / ० ९ / २०२१ रोजी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळालेल्या माहिती नुसार रात्री ११/३० वा चे सुमारास एक इसम हा त्याचे जवळील मोटर सायकलवर गावठी पिस्टल दराडुड सह अहमदनगर शहरात केडगाव भागात फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोसई / मनोज कचरे , पोना / १ ९ ०० बंडु भागवत , पोना / १४२ ९ शाहिद शेख , पोना / ५०० नितीन गाडगे , पोकॉ / १७ ९ ६ सुमीत गवळी पोकॉ / १४६४ अभय कदम , पोकॉ / १५७३ प्रमोद लहारे , पोकॉ / २६१७ सुशिल वाघेला अशांना बोलावुन घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे अहमदनगर शहरात केडगाच भागात कारमेल शाळे जवळ एका संशयीत इसमास सापळा रचुन जागीच पकडुन त्यांची नाव गाव विचारले असता भुषण रजणीकांत निकम वय -४० वर्ष रा- काकासाहेब म्हस्के रोड एम आय डी सी अहमदनगर ता नगर जि अहमदनगर असे सांगीतले असता त्यांची जागीच पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांचे ताब्यात गावठी बनावटिचे पिस्टल , दोन जिवंत राउंड तसेच त्यांची बजाज ई एक्स डी मोटार सायकल सह ४५२०० / – रु किंचे मुददेमाला मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले असुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ।। ७१७/२०२१ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
सदर आरोपी विरुध्द यापुर्वी राहुरी पोलीस स्टेशन व भिंगार पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . ०१ ) २६ ९ / २०१२ भा द वि कलम ३ ९ ५,३४१,१८२,१२० ( ब ) प्रमाणे . ०२ ) T७७ / २०१४ मा द वि कलम ३ ९ ४.३४ प्रमाणे सदरची कारवाई ही मा . पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साो . , अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सो . , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे