अमरापूर प्रतिनिधी – दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण.प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो.काळानुरूप सण साजरे करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत हीच बाब लक्षात घेऊन “ही दिवाळी अगदी पारंपारिक पद्धतीने साजरी करायची ” असे वाघोली ग्रामपंचायतने ठरवले.तसा एक संदेश “ग्रीन ग्रामपंचायत वाघोली” व्हॉट्स अप ग्रुप वर पाठवण्यात आला.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, या दिवशी सर्वांनी आपल्या घरातील देशी गायीची, गोधनाची शास्त्र पद्धतीने पूजा केली व पूजा करतानाचे फोटो ग्रुपवर पाठवण्यात आले.एवढ्या छोट्या निरोपावर गावकऱ्यांनी या उपक्रमाला अत्यंत हिरीरीने सहभाग घेतला.
यामध्ये सरपंच बाबासाहेब गाडगे, रघुनाथ दातीर, सोमेश्वर शेळके, अभिमन्यू महाराज भालसिंग, विठ्ठल क्षीरसागर, रमेश भालसिंग, हरिभाऊ शेळके, योगेश भालसिंग, महेश भाकरे, किशोर शेळके, संभाजी शेळके, सोपान पवार, रावसाहेब शींगटे, रंगनाथ शेळके,विलास शेळके , या सर्वांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला.
त्याबद्दल प्रोत्साहन म्हणून या सर्व ग्रामस्थांना हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ भगवद् गीता ग्रंथ भेट देण्यात आला.
या प्रसंगी अर्जुन देशमुख सर यांनी भगवद् गीता ग्रंथ उपलब्ध करून दिले.
अभिमन्यू महाराज व देशमुख सर यांनी देशी गायीचे महत्व अत्यंत मार्मिक शब्दांत ग्रामस्थांना पटवून दिले. या उपक्रमात सहभाग घेऊन हिंदू धर्म परंपरा टिकवण्यात सर्वांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल युवा सामाजिक कार्यकर्ते उमेशभाऊ भालसिंग यांनी सर्वांचे आभार मानले व यापुढेही आपण असेच उपक्रम राबवत राहू अशी संकल्पनाही सांगितली.
या कार्यक्रम प्रसंगी दादासाहेब जगदाळे सर, राजेंद्र जमधाडे, रामकिसन चव्हाण, पांडुरंग कळकुटे, अजित भालसिंग सर, बाजीराव आल्हाट , बापूसाहेब भालसिंग ,रमेश दातीर ,बाळासाहेब भालसिंग तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.आभार उमेशभाऊ भालसिंग यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके यांनी केले.