घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी कुकडी कालवा योजनेचे आवर्तन विसापूर तलावात सोडावे – मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन
नगर : तालुक्यातील घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत अकोळनेर, अरणगाव, बाबुर्डी बेंद, बाबुर्डी घुमट, देऊळगाव सिध्दी, हिवरेझरे, खंडाळा, खडकी, राळेगण म्हसोबा, सारोळा कासार, सोनेवाडी, तांदळी वडगाव, वडगाव तांदळी, वाळकी, घोसपुरी, गुंडेगाव, जाधववाडी अशा एकुण 17 गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु सध्या दुष्काळी परिस्थीती असल्या कारणाने व पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने सदरील पाणी पुरवठा योजनेस पाणीपुरवठा करणाऱ्या विसापुर तलावातील पाणी गेली 3-4 दिवसापासून संपलेले आहे. तलावात पाणी उपलब्ध नसल्या कारणाने सदरील योजना ही बंद झालेली असुन योजने अंतर्गत असणाऱ्या गावांना तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच गावांतर्गत असणाऱ्या वाड्या वस्त्यांना मंजुर झालेल्या टँकरचा पाणीपुरवठा ही याच योजनेवर अवलंबुन असल्याने वाड्या वस्त्यांना देखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.
सदरील पाणी पुरवठा योजने अंतर्गत असलेल्या गावांमध्ये तातडीने पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे असल्याने कुकडी कालवा योजनेच्या आवर्तनातुन तातडीने विसापूर तलावात पाणी सोडावे जेणेकरून लाभार्थी गावांमध्ये व वाड्यावस्त्यांमध्ये झालेल्या भीषण पाणीटंचाईचे संकट दूर होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल. तरी दुष्काळी परिस्थीती व भीषण पाणीटंचाईचे संकट पाहाता आपण कुकडी कालव्याचे आवर्तनाचे पाणी विसापुर तलावात सोडण्याचे आदेश द्यावेत व सदर गावांवरील पाणीटंचाईचे संकट दूर करावे अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी निवेदनातून केली, यावेळी बाजार समिती मा. सभापती हरिभाऊ कर्डिले, अभिलाष घिगे, रेवण चोभे, दादा दरेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शिष्टमंडळास सांगितले की नगर प्रांताधिकारी विसापूर तलावाची पाहणी करून प्रस्ताव ठेवतील व घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
- Advertisement -