पंतप्रधानांनी भारत वासीयांनसाठी मोफत लसीकरणाचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी – मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या सात वर्षात जनतेच्या विकास कामातून देशाचे महत्व जगाला दाखवून दिले आहे.कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाची आरोग्यसेवा कोलमडली परंतु नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या काम मुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याचे काम झाले आहे,नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी देशातील जनतेला मोफत लसीकरणाचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजिन बाजार समितीचे मा.सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी करून सामाजिक कर्तव्य जोपासण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.
बाजार समितीचे मा.सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिचोंडी पाटील परिसरातील नागरिकांनसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी बाजार समितीचे उपसभापती संतोष मस्के,विष्णू खांदवे,मनोज कोकाटे, दत्तात्रेय सदाफुले,बाबासाहेब खर्से,सुनील पंडित,दिलीप भालसिंग, बन्सी कराळे,बबन शेळके,बबन आव्हाड,उद्धव कांबळे,बाबासाहेब जाधव,बाळासाहेब निमसे,बाजीराव हजारे,सुनील उमाप,राजेंद्र कोकाटे,अशोक कोकाटे,अर्चना चौधरी, काशिनाथ बेलेकर,बाबासाहेब काळे,पोपट शेळके,भाऊसाहेब काळे,पांडुरंग निमसे,रमेश पिंपळे आदी उपस्थित होते.
कर्डिले पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 80 कोटी लोकांना मोफत लसीकरण देण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांच्या हाताचे काम गेले होते त्यांच्या उपजीविकेसाठी रेशन दुकाना मार्फत 80 कोटी लोकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे.देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये जमा केले,8 कोटी नागरिकांना उज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस कनेक्शन दिले, प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिली तसेच 43 कोटी नागरिकांचे जनधन योजनेत बँक खाते सुरू केली आहेत अशी विविध कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झाले आहे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना बाजार समितीचे मा.सभापती हरिभाऊ कर्डिले म्हणाले की,ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांच्या आजाराचा प्रश्न निर्माण झाला होता कोरोनाच्या काळात उपचार घेणे जमत नव्हते त्यामुळे अनेकांना डोळ्यांच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते यासाठी दरेवाडी गटामध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले याच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे. या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांच्या डोळ्याच्या आजारावर मोफत उपचार होणार आहे,यामध्ये औषधे,शस्त्रक्रिया व नंबरच्या चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे असे ते म्हणले.