चैतन्य मच्छिंद्रनाथ समाधी दर्शन प्रसंगी भाविक भक्तांच्ये झालेल्या गैरसोयीबद्दल देवस्थानच्या वतीने जाहीर दिलगिरी…
*******************************
पुढील वर्षीचा सोहळा सुसज्ज तयारीनिशी पार पाडू..
**********************************
— आ.सुरेश धस यांचे प्रतिपादन
**********************************
आष्टी (प्रतिनिधी)
वर्ष प्रतिपदेच्या आदल्या रात्री फाल्गुनी अमावस्येच्या रात्री श्री.क्षेत्र चैतन्य मच्छिंद्रनाथ यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी मच्छिंद्रनाथ गडावर आलेल्या भाविक भक्तांची गैरसोय झाली याबद्दल समस्त भाविक भक्तांची मच्छिंद्रनाथ देवस्थान दिलगिरी व्यक्त करत असून पुढील वर्षी मात्र सुसज्ज दर्शन व्यवस्था करून भाविक भक्तांचे चैतन्य मच्छिंद्रनाथ समाधी दर्शन व्यवस्थित होईल अशी चोख व्यवस्था ठेवू अशी ग्वाही मच्छिंद्रनाथ देवस्थान देवस्थानचे विश्वस्त आमदार सुरेश धस यांनी केले.
आष्टी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले की वर्ष प्रतिपदा गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री फाल्गुनी अमावस्येच्या निमित्ताने श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी स्थळ असलेल्या मच्छिंद्रनाथ गड येथे चैतन्य मच्छिंद्रनाथाची समाधी दर्शनासाठी उघडी असते.यावेळी मागील वर्षी समाधीला लावलेले उटणे, सुगंधी द्रव्य काढण्यात येऊन..समाधीला दुग्धाभिषेक करण्यात येतो त्यानंतर पैठण आणि इतर तीर्थक्षेत्रावरूनआणलेल्या पाण्याचे गंगा स्नान करण्यात येते त्यानंतर समाधी स्वच्छ पुसून त्यावर पुढील वर्षासाठी उटणे, सुगंधी द्रव्य लावण्याचे काम सूर्योदयापूर्वी ३० मिनिटांपर्यंत होत असते त्यामुळे रात्रभर भाविक भक्त समाधीच्या जवळ जाऊन मनोभावे दर्शन घेत असतात…
यावर्षीच्या समाधी दर्शन सोहळ्या वेळी अपेक्षा पेक्षा जादा भाविक भक्त उपस्थित झाले त्यामुळे अनपेक्षित जादा संख्येने आलेल्या या भाविक भक्तांच्या दर्शनाच्या रांगेमध्ये स्थानिक स्वयंसेवक, देवस्थान प्रशासन यंत्रणा तसेच पोलीस प्रशासन आणि भाविक भक्त यांच्यामध्ये आम्ही संवाद निर्माण झाला आणि दर्शन रांगेमध्ये एकाच जागी मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र झाल्यामुळे त्या ठिकाणी काही अघटीत घटना घडू नये… म्हणून प्रशासनाद्वारे रात्री २ वाजून ३० ते पहाटे ५ .३० या कालावधीमध्ये अत्यंत नाईलाजाने दर्शन व्यवस्था बंद करावी लागली आणि त्यामुळे भाविक भक्तांचे दर्शनामध्ये अडथळा निर्माण झाला… याबद्दल समस्त भाविक भक्तांचे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान व्यवस्था समिती द्वारे आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत असे सांगून… पुढील वर्षीच्या समाधी दर्शन सोहळ्याच्या वेळी मागील वर्षाचे उटणे काढणे… हा सोहळा दोन दिवस करता येईल का ? याबाबत देवस्थान व्यवस्थापक मंडळ, ग्रामस्थ, सावरगाव ग्रामपंचायत व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर करणार आहोत असे सांगून यावेळी समाधी दर्शन सोहळ्याच्या वेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर १ हजार रु. च्या बांधकाम निधी देणगी पावत्या घेतल्या आहेत यामध्ये व्यक्तिगत स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात देणगी देण्यात आलेली आहे.
त्याबाबत संस्थांचे अध्यक्ष मोबाईल नंबर 9423116214 आणि सचिव मोबाईल नंबर 7798750075 या दोघांचे नंबर पावतीवर देण्यात आलेले आहेत ज्या भाविक भक्ताचे समाधी दर्शन होऊ शकले नाही त्यांना१ हजार रु. देणगी परत देण्यात येणार आहे त्यामध्ये.. पुणे, नाशिक आणि नगर येथील भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर पावत्या घेण्यात आल्या आहेत.. ज्यांना ही रक्कम परत हवी आहे त्यांनी दि.३१ मे पर्यंत किंवा त्यानंतरही वैयक्तिक अथवा सामूहिक पद्धतीने पावत्या जमा कराव्यात..त्यानंतर जमा रक्कम रोख पद्धतीने अथवा आरटीजीएस पद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती यावेळी आ. सुरेश धस यांनी दिली…
पुढील वर्षीच्या चैतन्य मच्छिंद्रनाथ समाधी दर्शनाच्या सोहळ्याच्या वेळी सावरगाव येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ गड परिसरातील गहूखेल, शेडाळा, गंगादेवी, साकत येथील गंगातीर्थ कावड धारक आणि परिसरातील ५० गावातील नागरिकांची मदत घेऊन हा समाधी दर्शन सोहळा दोन दिवसाचा करता येईल का ? याबाबतचा विचार सुरू होऊन लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करू असे सांगत यावर्षी श्रीक्षेत्र चैतन्य मच्छिंद्रनाथ बाबा संजीवन समाधी दर्शन सोहळा साजरा करताना भाविक भक्तांची गैरसोय झाली झाली त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून पुढील वर्षी अधिक सज्जतेने,अधिक सोयी सुविधां उपलब्ध करून देऊन हा सोहळा साजरा करण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
- Advertisement -