जगात नावाजलेल्या तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी बोरा यांची नियुक्ती होणे, ही नगरकरांच्या वतीने भूषणावह बाब – कमलेश भंडारी
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
शहरातील उद्योजक सौरभ बोरा यांची आंध्रप्रदेश येथील तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.मर्चंट बँकेचे संचालक व जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी यांनी त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष रितेश पारख, पोपटलाल भंडारी, राजकुमार भंडारी, अजित भंडारी, मर्चंट बँकेच्या संचालिका प्रमिला बोरा, सुमित लोढा, कुणाल बडजाते, अनुज सोनी मंडलेचा, मिठूलाल भंडारी, संजय भंडारी, अमित वर्मा, श्याम भुतडा, गौरव बोरा, भावेश जामगावकर, जीनेंद्र गांधी, वैभव मेहेर, प्रितेश लुंकड, निलेश भंडारी आदींसह फाऊंडेशनचे युवक सदस्य उपस्थित होते.
भंडारी यांच्या निवासस्थानी बोरा यांनी सदिच्छा भेट दिली असता यावेळी त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. सौरभ बोरा यांनी देवस्थानच्या माध्यमातून देशभरात धर्मशाळा, हॉस्पिटल, अन्नछत्र व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते. सामाजिक भावनेने गरजू घटकांसाठी देवस्थान योगदान देत आहे. सर्व सहकारी, हितचिंतकांच्या शुभेच्छा व आशिर्वादाने ही निवड झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कमलेश भंडारी म्हणाले की, शहरातील उद्योजक सौरभ बोरा यांची जगात नावाजलेले व सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी नियुक्ती होणे ही नगरकरांच्या वतीने भूषणावह बाब आहे.या देवस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती होणारे जैन समाजातील ते पहिले व्यक्ती ठरले आहे.
शहरासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने भगवान बालाजीचे भक्त असून,ते दरवर्षी दर्शनाला जात असतात.आपल्या कुटुंबातील एका सदस्याची या देवस्थानवर वर्णी लागल्याने जिल्ह्यातील भाविकांना मोठा आनंद झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.