जहीर मुलानी यांना बेटी फाऊंडेशनचा सेवारत्न पुरस्कार जाहीर

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी) – वाजीद शेख

येथील महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे जिल्हाध्यक्ष जहीर अहमद मुलानी यांना यवतमाळ येथील बेटी फाऊंडेशनचा अंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मुलानी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जहीर मुलानी महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन बेटी फाऊंडेशनने त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. दि.26 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र, ढाल, मेडल व मानवस्त्र या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापुर्वी देखील मुलानी यांना सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कार मिळाले असून, सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles