जागतिक तापमान वाढीवर वृक्षारोपण हाच एक उत्तम पर्याय – मा. राहुलदादा राजळे
पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार व शिक्षण महर्षी स्व. दादापाटील राजळे यांच्या १८ वे पुण्यस्मरण निमित्त रविवार दि.30 जून २०२४ रोजी दादापाटील राजळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व वृध्देश्वर ग्रीन क्लबच्यावतीने १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यानिमित्त शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. राहुलदादा राजळे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरे जात उंच भरारी घ्यावी आणि हेच भाऊंच्या विचारांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल असे सांगितले. तसेच महाविद्यालयात होत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची प्रशंसा करतांना जागतिक तापमान वाढीवर वृक्षारोपन हाच एक उत्तम पर्याय आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. रामकिसन (आबा) काकडे यांनी भुषवले.
यानिमित्त शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री. शिवाजीराव राजळे, शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. सुभाषराव ताठे, मा.श्री. सुभाषराव बुधवंत, मा. श्री. श्रीकांत मिसाळ, मा. श्री. बाबासाहेब किलबिले, मा. श्री. नारायणतात्या काकडे, मा. शेषराव ढाकणे, मा. श्री. चारुदत्त वाघ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक मा.जे.आर.पवार, सचिव मा.भास्करराव गोरे ,मा.आर.जे.महाजन, प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, प्राचार्य प्रदिप देशमुख, प्राचार्य सुनिल पानखडे, डॉ. एम. एस. तांबोळी अधिक्षक श्री विक्रमराव राजळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी डॉ. आसाराम देसाई, वृध्देश्वर ग्रीन क्लबचे समन्वयक, डॉ. संजय भराटे, प्रा. दुर्गा भराट, प्रा. महेश गोरे, प्रा. बळीराम चव्हाण, प्रा. अस्लम शेख, स्टाफ सेक्रेटरी डॉ. के. जी. गायकवाड , डॉ जे.एन नेहुल, डॉ. जी. बी. लवांडे, डॉ. एस.जे. देशमुख, प्रा. सी. एन. पानसरे, डॉ.आर टी घोलप डॉ. साधना म्हस्के, डॉ. निर्मला काकडे व सर्व महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.