जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नासीर पठाण, उपाध्यक्षपदी अशोक निमोणकर तर सचिवपदी मिठुलाल नवलाखा सहसचिवपदी अविनाश बोधले तर खजिनदारपदी सुदाम वराट, कार्याध्यक्ष पदी संतोष थोरात तसेच अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाच्या सहचिटणीसपदी यासीन शेख यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या
जामखेड पत्रकार संघाची आज दि. २६ रोजी अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ पत्रकार पोपट गायकवाड, सुनील कोठारी, एस मार्टचे मालक संतोष फिरोदिया, अहमदनगर शहर बॅंकेचे संचालक संजय घुले, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश उगले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष गुंदेचा यांनी जामखेड तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर केली. तसेच काही सदस्यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. यावेळी जामखेड, खर्डा, नान्नज, जवळा साकत, मोहा, पिंपरखेड येथील सुमारे चाळीस पत्रकार उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणीवर दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी मोहिद्दीन तांबोळी, दैनिक सार्वमतचे प्रतिनिधी समीर शेख, दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी दत्तराज पवार, दैनिक केसरीचे प्रतिनिधी किशोर दुशी, दैनिक सकाळचे प्रतिनिधी सत्तार शेख, एन. टिव्ही न्युजचे प्रतिनिधी नंदुसिंग परदेशी, राष्ट्र सह्याद्रीचे प्रतिनिधी राजेंद्र म्हेत्रे, ज्येष्ठ पत्रकार पोपटराव गायकवाड, सुनील कोठारी यांच्या निवडी करण्यात आल्या
यावेळी कायदेविषयक सल्लागार म्हणून अॅड हर्षल डोके व अॅड अमोल जगताप, विश्वदर्शन न्युजचे संपादन गुलाब जांभळे तसेचपत्रकार अनिल धोत्रे, बाळासाहेब शिंदे, गणेश जव्हेरी, बाळासाहेब वराट, अशोक वीर, राजेश भोगील, किरण रेडे, पप्पूभाई सय्यद, आसीफ सय्यद, धनराज पवार, संतोष गर्जे, अजय अवसरे, फारूक शेख, संतोष नवलाखा, पोपट गायकवाड, वामन डोंगरे, कैलास शर्मा, तुकाराम अंदुरे, जाकीर शेख, रियाज शेख, दादा जगताप उपस्थित होते.
यावेळी पत्रकार धनराज पवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आला.
यावेळी बोलताना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गुंदेचा म्हणाले की, पत्रकारांनी आपापसातील मतभेद बाहेर येऊ न देता चार भिंतींच्या आतच मिटवावेत व एकसंघ राहुन आपल्या प्रश्नांची सोडवणूक करावी तसेच पत्रकार भवन व पत्रकार वसाहतीचा प्रश्न सर्वानी एकत्र आल्यावर सुटू शकतो. आजही चांगल्या पत्रकारांना समाजात खुप मानाचे स्थान आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदुसिंग परदेशी तर आभार दत्तराज पवार यांनी मानले.