जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने नूतन परिवहन अधिकारी विनोद सगरे यांचे स्वागत
नूतन आरटीओ विनोद सगरे आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटवतील – अविनाश घुले
नगर – अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विनोद सगरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा संघटनेच्यावतीने अध्यक्ष अविनाश घुले यांनी सत्कार केला. याप्रसंगी दत्ता वामन, विलास कराळे, लतिफभाई शेख, किशोर कुलट, सोपान दळवी, अशोक औशिकर, शकिल शेख, संजय सहाणे, विकास साठे, अक्षय साठे, अल्ताफ शेख, अविनाश वानखेडे, राजेश विधाते आदि उपस्थित होते.
यावेळी अविनाश घुले म्हणाले, नगर जिल्ह्यात ऑटो रिक्षांची मोठी संख्या आहे. रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. नगरच्या आरटीओ कार्यालयास संघटनेचे नेहमीच सहकार्य राहील आहे. अधिकारीही रिक्षा चालकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असतात. आज रुजू झालेले विनोद सगरे यांची विविध ठिकाणची कारकर्दी प्रभावी राहिली आहे. नगरमध्येही ते आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त केला. शासनाच्यावतीने सध्या रिक्षा नुतनीकरण न केलेल्या रिक्षांसाठी दररोज 50 रुपयांची दंडाची अट रद्द करावी, यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आपणही सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी विनोद सगरे यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांशी विविध विषयावर चर्चा करुन शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याबरोबर शिस्त लावण्याचा आपला प्रयत्न राहील. आपल्या संघटनेच्या प्रश्नांबाबत नियमाप्रमाणे सकारात्मक कार्यवाही करु, असे आश्वासन दिले.
यावेळी दत्ता वामन यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देऊन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल सांगितले.