जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५१ कोटींचा निधी मंजूर / पहिल्या टप्प्यातील १५.५ कोटींच्या निधीला मान्यता

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

- Advertisement -

जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५१ कोटींचा निधी मंजूर / पहिल्या टप्प्यातील १५.५ कोटींच्या निधीला मान्यता

अहमदनगर – नगर शहरातील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे, दुरुस्ती करणे, इनडोअर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने ५१ कोटी १७ लाख २५ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १५ कोटी ६९ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात ३५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपयांच्या निधी मिळणार मिळणार आहे. या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी केली.

याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे. नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभरण्यात आले आहे. परंतु तेथे पुरेशा सुविधा नाहीत. क्रीडा प्रेमी व विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५१ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १५ कोटी ६९ लाख ५२ हजार रुपये निधी मिळणार आहे. त्यामध्ये ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, क्रिकेट ग्राउंड लॉन, स्टेडियम करिता स्प्रिंकलर सिस्टीम करणे, कबड्डी, खो खो, बास्केट बॉल, व्हॉलिबॉल मैदानांचे डोम रूफ, ग्राउंड व इतर बाबींचा समावेश आहे.

दुसर्‍या टप्प्यामध्ये ३५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरी स रूफिंग करणे, स्वच्छतागृह दुरुस्ती, रेनवॉटर, बॅडमिंटन हॉल, अद्ययावतीकरण, वुडन फ्लोरिंग करणे, स्वच्छतागृह, सोना व स्टीम बाथ व्यवस्था, ऑकेस्टिक व्यवस्था, वसतिगृह (दुसरा मजला बांधकाम, पेव्हर ब्लॉक संपूर्ण इमारत, रुममधील अंतर्गत कामे, जलतरण तलाव अद्ययावतीकरण, फिल्ट्ररेशन प्लांट दुरुस्ती, वेट जीम ट्रेनिंग हॉल, स्वच्छतागृह, अंतर्गत व बाह्य रंग रंगोटी, प्रेक्षक गॅलरी रूफिंग, पार्किंग एरियामध्ये पेव्हर ब्लॉक, टू व फोर व्हिलर पार्किंग शेड करणे, स्वागत कक्ष अंतर्गत कामे, कुस्ती व बॉसिंग हॉल बांधकाम, कुस्ती तालीम अद्ययावतीकरण व नवनिर्मिती, दुमजली बांधकाम तळमजला कुस्ती हौद, पहिला मजला कुस्ती मॅट हॉल, दुसरा मजला बॉसिंग हॉल, कबड्डी व खोखो मैदानांचे अद्ययावतीकरण, डोम रूफ व स्वच्छतागृह बांधकाम, दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करणे, सीसी रोड, एन वॉटर गटार व्यवस्था, विद्युतीकरण अंतर्गत व बाह्य, ड्रेनेजलाइन व्यवस्था, पाणीलाइन व्यवसथा, रुफ टॉप सोलन पॅनल व्यवस्था, स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, वसतिगृह, जलतरण तलाव, कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे. राज्य सरकारकडे आमदार जगताप यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आले असून निधी मिळाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पलटणार  असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles