एका मोटरसायकलच्या मोठ्या अपघाता मधून अपघातग्रस्त दोन व्यक्तींना तातडीने रुग्णालय दाखल करून त्यांना जीवदान देणाऱ्या माणसातील देवदूत सौ.हर्षदाताई काकडे
अहमदनगर प्रतिनिधी :- शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणारे कुटुंब म्हणजे अॅड शिवाजीराव काकडे व हर्षदाताई काकडे दाम्पत्य.ढोरजळगांव येथे एका टु व्हिलरवर चाललेल्या दोन व्यक्तीचा अपघात सौ हर्षदाताई काकडे यांच्या समोर घडतो. क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावतात . उपस्थितात एकच चर्चा होते ती म्हणजे माणसातील देवदूत सौ . हर्षदाताई काकडे . ढोरजळगांव ग्रामस्थांना आलेला अनुभव .
जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे अहमदनगरला जिल्हा परिषदेच्या मिटींगसाठी शेवगाव-अहमदनगर महामार्गाने चालल्या असता . त्या आणि त्यांच्यासमवेत असलेले कार्यकर्ते अहमदनगर ला मिरी मार्गे जात असताना एक व्यक्ती व त्याचे पाहुणे गाडी चालवताना अपघात होऊन रस्त्यावर खाली पडले होते.ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत . पाहुणे रक्ताने माखलेले . जवळपास १०० जणांची बघ्याची गर्दी जमली होती परंतु त्यांना हात लावण्यास कोणतीच व्यक्ती पुढे येत नव्हती फोटो शूटिंग चालू होती परंतु कोणी हात लावत नव्हते.काही विचारपुस करत होते . तर काही अपघात ग्रस्तांच्या नातेवाईकांना फोन करत होते .
त्याचवेळी शेवगाव च्या जिल्हा परिषद सदस्य सौ . हर्षदाताईं काकडे यांची गाडी थांबते . सौ . हर्षदाताई काकडे ताईंसह त्यांच्यासमवेत श्री.आजिनाथ विघ्ने श्री.प्रवीण ऊकिर्डे श्री.भरत भालेराव श्री.सुधाकर आल्हाट हे तत्काळ खाली उतरवून क्षणाचाही विलंब न करता मानुसकी दाखवत जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्यासमवेत असणारे आजिनाथ विघ्ने यांना हर्षदा ताई यांनी सांगितले की , या श्री.भगवानराव गर्जे, श्री.मारुती ढाकणे या अपघात ग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे सांगितले.
अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला हर्षदा ताई यांनी स्वतः च्या गाडीत घेऊन ढोरजळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले व ताबडतोब १०८ रूग्नवाहिका बोलवुन प्राथमिक उपचार करून अहमदनगरला हलवले व सोबत असणारे आजिनाथ विघ्ने यांना पेशंटसोबत अँडमिट करण्यासाठी नगरला विखे फाउंडेशन येथील हॉस्पिटलमध्ये पाठविले . मारुती ढाकणे या अपघात ग्रस्तांना यांना शेवगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले.
त्यामुळे अपघातुन ‘दोन ‘व्यक्तीला जीवदान मिळु शकले . परिसरातून जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदा ताई काकडे यांचे कौतुक करण्यात आले.
व्यक्ती म्हणून माझी नैतिक जवाबदारी !
शेवगाव येथून अहमदनगर ला जात असतांना एक मोटरसायकलचा मोठा अपघात झालेला होता मी ताबडतोब गाडी थांबवून माझ्या समवेत असणाऱ्या सहकाऱ्यांना तत्काळ जखमींना उचलण्यास सांगितले.त्यामध्ये एका व्यक्तीचा प्रचंड रक्त स्त्राव चालू होता तो थांबवण्याचा प्रयत्न केला.एक माणूस म्हणून जखमींना योग्य ती शुश्रूषा मिळावी या करीता त्यांना आपल्या गाडीत रुग्णालयात दाखल करून पुढील योग्य ते उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या.माझी सर्वांना एकच विनंती आहे वाहने जपून चालावा व कुठलाही अपघात आपल्या समोर झाल्यास जखमींची मदत करा.असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी केले