अहमदनगर प्रतिनिधी – नगर जिल्ह्यातील प्रमुख सरकारी रुग्णालय असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला आज सकाळी भीषण आग लागली.आयसीयू विभाग तसेच आजूबाजूला या आगीचे लोळ पसरले. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समजत आहे.
तसेच अनेक जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे देखील कळत असून महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ सिविल हॉस्पिटल या ठिकाणी पोहोचून आग विझवण्याचे कार्य केले. पोलीस प्रशासन देखील तात्काळ या ठिकाणी पोहचून मदत कार्य तसेच हि आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेत आहे.
सणासुदीची मध्ये झालेल्या या दूर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने नगर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.