डाळ साखर वाटायला मन मोठे लागते, मतदार पोपटपंचीला थारा देणार नाहीत : तालुकाध्यक्ष राहुल शिंदे
पारनेर प्रतिनिधी : डाळ आणि साखर वाटायला मनाचा मोठेपणा लागतो कमिशनच्या वातावरणात अडकलेल्यांना त्याचे महत्व काय कळणार ? या शब्दात निलेश लंके याच्या टिकेचा समाचार पारनेर भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी घेतला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका जशाच्या जवळ येऊ लागले आहेत, कसे वातावरण गरम होऊ लागले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट उमेदवार निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर टिका करत म्हणाले की डाळ आणि साखर वाटून विखेंनी अपयश झाकले. त्यांच्या या टिकेला पारनेच्या भाजप अध्यक्षांनी चांगलाच समाचार घेतला. सुजय विखे यांचे मन यांच्या मनाचा मोठेपणा कमिशन खाणाऱ्या मंडळीना समजणार नाही. विखे पाटील परीवार सामाजिक बांधिलकी कशी जपतो हे जिल्ह्यातील जनतेला चांगले माहीत आहे.त्यामुळे निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्या उपक्रमावर टिका करण्यापेक्षा जनतेप्रती सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी काय केले हे सांगावे. पारनेरच्या जनतेचे कोणते प्रश्न लंके यांनी मार्गी लावले हे सांगण्याचे आव्हान शिंदे यांनी यावेळी दिले.
लंके यांना आपल्या राजकीय कारकिर्दित पारनेरला साधे रस्ते देखील तुम्हाला करता आले नाहीत याची खंत व्यक्त करत, केवळ पोपटपंची करून राजकारणात जास्त दिवस टिकता येणार नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देते. मात्र कामाच्या माध्यमातून विखे पाटील परीवार पन्नास वर्ष राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकाराणात तसेच समाजिक क्षेत्रात टिकून आहे यामागे केवळ जनतेचे त्यांना मिळत असलेले समर्थन कारणीभूत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील जनता सूज्ञ आहे. त्यामुळे माजी आमदार लंकेंनी, केवळ बडबड करून विखेवर टिका करणे बंद करून, विकासाच्या मुद्यावर बोलावे असा सल्लाही लंके यांना दिला.
महाविकास आघाडी सत्तेत असताना, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार याचें लाडके असतानाही त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला असल्याचा घणाघात शिंदे यांनी केला.
लंके यांनी आपल्या कारकिर्दित एकही रुपयाचा निधी पारनेर मध्ये आणला नाही. आणि आता दुधाचा प्रश्न पुढे करत संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र विधानसभेत एकदाही दुधाचा प्रश्न मांडला नाही. तसेच अडीच वर्ष तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते कितींदा प्रश्न उपस्थित केला, हे देखील जनतेने येवून सांगा. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ६७ कोटी रुपये दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. मात्र तुमच्याकडे सांगण्यासाठी काही नसल्यामुळे भूलथापा मारण्याचा केवीलवाणा प्रयत्न करून प्रचार करत असला तरी मतदार तुम्हाला थारा देणार नाहीत असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.