डॉ. अनिल आठरे कुटुंबियांवर कठोर कारवाई करण्याची गणेश फसले यांची पो. अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून मागणी 

- Advertisement -

डॉ. अनिल आठरे कुटुंबियांवर कठोर कारवाई करण्याची गणेश फसले यांची पो. अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून मागणी 

नगर : झोपडी कॅन्टीन समोरील आठरे हॉस्पिटलमध्ये आरोग्य उपचार संबंधी वस्तू माझ्या असून मी त्या घेण्यासाठी तिथे गेलो असता डॉ. अनिल आठरे व डॉक्टर अंजली आठरे आणि त्यांची मुलगी आदिती आठरे यांनी शिवीगाळ करत मला बेदम मारहाण करत माझ् यावर जीवघेणा हल्ला केला आहे तरी डॉ. अनिल आठरे कुटुंबीयांवर कारवाई करावी आणि मला आठरे हॉस्पिटलमधील माझ्या हक्काच्या वस्तू परत मिळवून देत न्याय द्यावा अशी मागणी गणेश फसले यांनी पो. अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गणेश फसले यांनी पो. अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटलय की, डॉ. अनिल आठरे व डॉ. अंजली आठरे यांच्याकडून जून 2020 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय अहमदनगर येथे रजिस्टर रेंट एग्रीमेंट करून रुपये १ कोटी डिपॉझिट देऊन प्रतिमाह एक लाख रुपये भाडे याप्रमाणे करारनामा केला होता त्यानुसार मी हॉस्पिटल चालवत होतो त्याचवेळी डॉक्टर अनिल आठरे व डॉक्टर अंजली आठरे यांनी त्यांची कन्सल्टिंग म्हणून प्रत्येकी दोन लाख 50 हजार रुपये प्रतिमाह याप्रमाणे बलदोटा वकिलांकडनं ऍफिडेविट करून घेतले होते व जागा वापरण्याचे मेंटेनन्स म्हणून दोन लाख रुपये प्रति महिना याप्रमाणे बलदोटा वकिलांकडून एफिडेविट करून घेतले होते परंतु सदर रक्कम देना आम्हाला 2022 मध्ये शक्य होत नव्हतं त्या कारणास्तव आम्ही डॉक्टरांना विनंती केली असता की आम्हाला तुमची कन्सल्टिंग व मेंटेनन्स देणे परवडत नाही आम्ही तिथून पुढे देऊ शकत नाही.

त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला धमकावली की तुम्हाला जागा भाडे बरोबर माझी कन्सल्टिंग व मेंटेनन्स द्यावाच लागेल व अशी दडपशाही करून मला तेथून हाकलून लावले व माझे सर्व मशिनरी व डिपॉझिटची एक कोटी रक्कम ही दाबून ठेवली आहे मी वेळोवेळी प्रशासनाकडे या प्रकाराची दाद मागितली मला वेळोवेळी प्रशासनाकडून कुठलीही मदत झालेली नाही उलट डॉक्टरांचे राजकीय संबंध चांगले असल्या कारणामुळे त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करून कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ दिली नाही , दिनांक ९ जून २०२४ रोजी सायंकाळी मी माझे मटेरियल आणण्यास तिथे गेलो असता डॉ. अनिल आठरे यांची मुलगी आदिती आठरे ही त्या भाड्याच्या जागेमध्ये आली व तुम्ही इथून कुठली वस्तू नेऊ शकत नाही यावरून वाद करू लागली तर मी त्यांना सांगितलं जर मी या वस्तू माझ्या आहेत व त्या मी घेऊन जाऊ शकत नसेल तर मला तुमच्याकडे असलेली माझी ताबा पावती दाखवा अन्यथा माझ्या वस्तू न नेण्याच्या कोर्ट ऑर्डर दाखवा अशी कुठलीही कागद तुम्ही दाखवलं तर मी कुठलीही वस्तु नेणार नाही असे मी त्यांना सांगत असताना त्यांचे वडील डॉक्टर अनिल आठरे हे त्या ठिकाणी येऊन त्यांनी मला तोंडावर व छातीमध्ये बुक्क्यांनी मारहाण केली डॉक्टरांना मी हृदयाचा पेशंट आहे हे माहीत असतानाही त्यांनी जाणून बुजून माझ्या डाव्या बाजूला मला मारहाण केली व मला संबोधले की खासदारांचे व माझे संबंध खूप चांगले आहेत मी तुला खडी फोडायला नाही पाठवलं तर माझं नाव याद राख,,, त्या ठिकाणी माझे सहकारी ज्यांनी माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेली होती ते गणेश घोरपडे माझ्यासोबत त्या ठिकाणी होते तर तेव्हा डॉक्टर अनिल आठरे व त्यांची मुलगी आदिती आठरे यांनी दोघांनी माझ्या मित्रालाही उलट सुलट बोलले त्याला बोलले तुम्ही खालच्या थराचे लोक, तुमच्याकडे हॉस्पिटलमध्ये इन्व्हेस्ट करायला पैसे कुठून आले ? तुम्ही गुंड आहात असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत डॉक्टर अनिल आठरे व त्यांची मुलगी आदिती आठरे या दोघांनी माझे सहकारी गणेश घोरपडे यांनाही केली माझे मित्रही त्यांना विनंती करत होते की डॉक्टर यांच्या वस्तू आहेत त्या तुम्ही त्यांना देऊन टाका कारण त्यांनी तुम्हाला जी एक कोटीची रक्कम दिलेली आहे व या वस्तू घेण्यासाठी जे काही पैसे लागलेले आहेत ते सर्व काही त्यांच्याकडे स्वतःकडे नसून त्यांनी सहकारी पार्टनर ची मदत घेतलेली आहे व आज ते सर्व लोक यांना त्रास देत आहेत.

संबंधित आठरे डॉक्टरमुळे मला जीव नकोसा झालाय, माझे पैसे, वस्तू या माणसाने डांबून ठेवल्यामुळे मला एक तर या वस्तू मिळणे गरजेचे आहे किंवा आत्महत्या करणे गरजेचे आहे प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊनही फक्त डॉ. अनिल आठरे यांचे राजकीय वलय चांगले असल्यामुळे तुम्ही लोक मला कुठल्याही प्रकारची मदत करत नाहीयेत हे मला दिसून येते डॉक्टर सर्व प्रकारचे खोटे सांगत आहेत की भाडे देणे बाकी आहे 80 लाख रुपयांच्या केस कोर्टात केलेल्या आहेत परंतु सदर केसला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे तरीसुद्धा प्रशासनाचे डोळे उघडत नाहीयेत मी आपणास विनंती करतो की त्या ठिकाणी अवैधरित्या डॉ. अनिल आठरे व डॉक्टर अंजली आठरे यांनी डांबून ठेवलेल्या माझ्या वस्तू मला मिळाव्यात आणि मला न्याय मिळवून द्या तसेच डॉक्टर अनिल आठरे हे त्यांच्या मुलीला आदिती आठरेला पुढे करून आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करत आहेत व प्रशासनही हे खोटे गुन्हे दाखल करून घेत आहे तरी प्रशासनाने सर्व प्रकारची शहानिशा करूनच गुन्हे दाखल करावे अशी मागणी गणेश फसले यांनी पो. अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles