डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायनेटिक चौक येथील आराध्य प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचे फाउंटन देखाव्याचे उद्घाटन.
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायनेटिक चौक येथील आराध्य प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचे फाउंटन देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते मयूर बांगरे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, निलेश बांगरे, चंदूभाऊ औशीकर, विजय गव्हाळे, आराध्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.संदेश इंगळे, उपाध्यक्ष पै.दादा पेटारे, मनोज कोतकर, दत्ता खैरे, प्रामाणिक विधाते, तौसिप खान, अक्षय शिंदे, प्रशांत हातरुणकर, सचिन पवार आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, डॉ.बाबासाहेब यांच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम देशाची संकल्पना देखाव्याच्या स्वरूपात उभी केली असून बाबासाहेबांनी दीन दलितांच्या उद्धारासाठी कार्य करून गुलामगिरीतून चाचपडलेल्या समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. राज्यघटनेतून समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न त्यांनी साकारले अस्पृश्यता आणि जातीय व्यवस्थेच्या अंधारात प्रकाश वाट निर्माण करून त्यांनी न्याय प्रस्थापित केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले..
- Advertisement -