अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील 8 विद्यार्थ्यांची पुणे,मुंबई,बंगलोर या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली,अशी माहिती प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण होताच नोकरी मिळवून देण्यासाठी अनेक वर्षापासून अनोखा पॅटर्न राबवित असल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.या वर्षी देखील इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात विविध कंपन्यामार्फत अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखती घेऊन प्रथम योग्यता चाचणी घेतली व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.
यावेळी पुणे, मुंबई, बंगलोर अशा शहरातील कॅपजेमिनी,टीसीएस,टेक महिंद्रा,विप्रो अशा कंपनीमध्ये 8 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली.यामध्ये संदिप नजन, स्नेहा पगारे,गौरी काबरा, निकिता तांबे,वैभव भोंडे, ऋतुजा पालवे,स्नेहल डोके, स्नेहल केंडके यांचा समावेश आहे.सर्वांना ४.५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याचे डॉ.नाईक यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांचे डॉ.विखे पा.फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर (टेक्नि.) प्रा.सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ.उदय नाईक तसेच विभागप्रमुख डॉ.दीपक विधाते यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे यांनी प्रयत्न केले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील,सेक्रेटरी डॉ.बी.सदानंदा,डायरेक्टर टेक्नि.डॉ.पी.एम.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.