अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषी महाविद्यालयात ‘देशी पदविका’ उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त वसंतराव कापरे, फॅसिलिटेटर डॉ.एच.एल.शिरसाठ, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर.के.गायकवाड, तंत्र उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे आदि उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविकात डॉ.शिरसाठ यांनी सांगितले की, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन या हैद्राबाद संस्था मान्यताप्राप्त मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. कृषी विस्तार सेवा पदविका हा एक वर्षांचा कोर्स येथे सुरु झालेला असून, यामध्ये पहिल्या तुकडीचे प्रशिक्षणात अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये 18 जणांना विशेष प्राविण्यासह प्रथमश्रेणी मिळाली तर 22 प्रशिक्षणार्थींनी प्रथम श्रेणी मिळविली आहे.
यावेळी विश्वस्त वसंतराव कापरे म्हणाले, शाश्वत शेती, सेंद्रीय शेती, कोरडवाहू शेती, कृषी निविष्ठा उत्पादन, वेळेचे नियोजन आदि गोष्टीची माहिती देत, शेतकर्यांना, विक्रेत्यांना कसा फायदा होईल, याबाबत माहिती दिली.
श्री.शिवाजी जगताप यावेळी म्हणाले, व्यवसाय करतांना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून योग्य दरात गुणवत्ता पूर्ण निविष्ठा पुरविलेल्या तर उत्पन्न वाढव्यास मदत होईल, असे सांगितले. ज्ञानाचा वापर, व्यवसायात कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती आर.के.गायकवाड यांनी दिली.
कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी आणि देशी पदविका उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीना संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पा., मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक सुनिल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. तर यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.एस.बी.राऊत यांनी केले तर आभार डॉ.धोंडे यांनी मानले.