डोके विद्यालयात लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद सावेडी उपनगर कोरोनामुक्त करणे हेच नगरसेवकांचे उद्दिष्ट – नगरसेवक सुनिल त्र्यंबके

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते

‘चला लस घेऊ या, कोरोनाला हरवू’ या सादेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत्र आहे. सावेडी उपनगर कोरोनामुक्त करणे हे प्रभाग दोनच्या चारही नगरसेवकांचे उद्दिष्ट आहे.

नागरिकांच्या प्रतिसादामुळे लसीकरणाला वेग आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नगर शहरातील रुग्णसंख्या वेगाने कमी झाली. तरीही प्रत्येकाने स्वत:ची व कुटूंबाची काळजी घेणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

तपोवन रोडवरील डोके विद्यालयात वसंत टेकडी येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व अ.नगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरणाचा शुभारंभ श्री.त्र्यंबके यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, सचिन गाडे, आकाश त्र्यंबके, रोहन कुडिया, गौरी दडगे उपस्थित होते.

श्री.त्र्यंबके पुढे म्हणाले, कोरोनामुळे संकटाचा डोंगर सर्वांपुढे उभा आहे. यावर मात करुन आपल्याला पुढे जायचे आहे. लस जरी घेतली तरी तेवढीच सावधानता घेणे आवश्यक आहे. प्रभाग दोनमध्ये चारही नगरसेवक आपआपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवित आहेत. त्यामुळे 100 टक्के लसीकरण होऊन, सावेडी उपनगर कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

निर्मलनगर परिसरातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. आरोग्य विभागाच्यावतीने डॉ.निलम थोरात, परिचारिका स्वाती कांबळे, डाटा ऑपरेटर दिनेश तरोटे, आशा सेविका अफसाना शेख यांनी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लस या केंद्रावर दिल्याने त्याचा लाभ अनेकांनी घेतला.

साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे योगेश पिंपळे यांनी नागरिकांना मोबाईलवर नोंदणी करुन सर्वांना सहकार्य केल्याने वेळ वाचला. त्यामुळे दिवसभरात 250 ते 300 नागरिकांनी लस घेतली.

या केंद्रासाठी डोके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.डी.क्षेत्रे, उपशिक्षिका पांडूळे मॅडम, पवार मॅडम, बर्वे मॅडम, यांनी सहकार्य केले. या सर्वांचे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles