ताबा मारीचा आरोप असलेल्या वाणी नगरच्या शेतजमिनीचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा

- Advertisement -

ताबा मारीचा आरोप असलेल्या वाणी नगरच्या शेतजमिनीचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा

स्थानिक महिला राजकीय व्यक्तींना हाताशी धरून खोट्या नाट्या तक्रारी करून वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत करत असल्याचा आरोप

राजकीय व्यक्तींनी जमिनीचे कागदपत्रे तपासून घेण्याचे आव्हान – पवन कुमार अग्रवाल

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी वाणी नगर येथील शेत जमिनीचा वाद चांगलाच पेटला असून स्थानिक महिला ही खोट्या नाट्या तक्रारी अर्ज करून व काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरून आमच्या स्वतःच्या नावावर असलेल्या व शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये पवनकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला.

पुढे म्हणाले की, पाईपलाईन रोड वाणी नगर परिसरातील गट. क्र. 25/1ब व 25/1ड ही मिळकत शंकर वाणी यांच्याकडून दि. 7 डिसेंबर 1992 मध्ये खरेदी खताने लिलावती नंदकिशोर अग्रवाल हिच्या नावे खरेदी केलेली होती व त्याचप्रमाणे मिळकतीचे महसूल दप्तरी नोंद झालेली होती. दरम्यान आई मयत झाल्यानंतर सदर मिळकतीस माझी व पवन कुमार नंदकिशोर अग्रवाल, हेमलता प्रकाश अग्रवाल, शिव प्यारी प्रमोद अग्रवाल, किरण प्रदीप कुमार अग्रवाल, आनंद प्रदीप कुमार अग्रवाल अपाक किरण, स्नेहा प्रदीप कुमार अग्रवाल अपाक किरण, राजलक्ष्मी प्रदीप कुमार अग्रवाल अपाक किरण, यांची नावाची वारसा हक्काने फेरफार क्र.25458 नोंद झालेली आहे.

सदर जागेमध्ये हद्दी खुणा प्रमाणे पत्राचे कंपाउंड करण्यासाठी मंजूर लावले व सदर जमिनीमध्ये कंपाउंड करीत असताना वेणुबाई विठ्ठल वाणी व इतर १० ते १५ लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार अर्ज दिला सदर जागेवर पत्र्याचे कंपाउंडचे काम चालू असताना ठेकेदार राज उर्फ राजेश हिरामण शेलार यांनी वेणुबाई विठ्ठल वाणी व इतर लोकांविरुद्ध कलम ३७९ फिर्याद तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल केली. वास्तविक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण काळे यांना सदर जमिनीचा सातबारा उतारा, खरेदीखत, कोर्टात दावे दाखल केलेले याची काही माहिती व कागदपत्र न पाहता पोलीस अधीक्षक यांना बळजबरीने सदर जमिनीवर ताबा घेत आहे असा अर्ज दिलेला आहे.

३० एप्रिल २०११ रोजी तहसीलदार नगर यांनी जमीन मालक यांची पीक पाहणी सदरी नोंद घ्यावी असा निकाल पवन कुमार नंदकिशोर अग्रवाल यांच्या बाजूने दिलेला आहे सदर निकालावर नाराज होऊन वेनुबाई विठ्ठल वाणी व इतर यांनी उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपील दाखल केलेली आहे व उपविभागीय अधिकारी यांनी पीक पाहणी संदर्भात निकाल दिला सदर निकालावर वेणूबाई वाणी यांनी पीक पाहणी संदर्भात सातबारा उताऱ्यावर नोंद असल्याचा गैरफायदा घेऊन माझ्या ताब्यात सर्व जमीन आहे.

सदर जमिनीची मालक आहे असे भासुण खोटे दावे दाखल व केसेस अर्जदार विरुद्ध दाखल केलेले आहे विनू बाई विठ्ठल वाणी व इतर यांनी हेमलता प्रकाश अग्रवाल यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालय अहमदनगर यांच्या कोर्टात दाखल केला सदर दाव्यामध्ये न्यायालयाने या अर्जाद्वारा विरुद्ध मनाई हुकूम दिलेला नाही सदर दाव्यामध्ये वेणूबाई विठ्ठल वाणी यांनी १४ मे २०२४ रोजी पवन कुमार नंदकिशोर अग्रवाल यांच्याविरुद्ध मे कोर्टात मनाई हुकूम मागितला होता त्यावर प्रतिवादी सदर दाव्यामध्ये हजर होऊन म्हणणे दिले व सदर अर्ज गुणदोषावर न्यायालयाने नामंजूर केलेला आहे वास्तविक पाहता किरण काळे यांनी कोणतीही कागदपत्रे खरेदी खत न पाहता सदर जमीन कोणाच्या ताब्यात आहे सदर जमिनीचे खरेदी खत कधी झालेले आहे सत्य घटना काय आहे याबाबत कोणतीही शहानिशा न करता केवळ महिला असल्याने तिच्या बाजूने उभे राहून अर्जदार यांच्याविरुद्ध खोटे दावे दाखल करून खोटे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी निवेदनाद्वारे दिलेली असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून सत्यता जाणून घ्यावी व अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवन कुमार नंदकिशोर अग्रवाल यांनी केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles