दररोज 50 रुपयांचा दंडाची अट शिथिल करण्यात यावी – अविनाश घुले
जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
नगर – अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्यावतीने रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी लागणारा दंड स्थगित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ता वामन, गणेश आटोळे, नासिर खान, सुधाकर साळवे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे रिक्षाला दरवर्षी तंदुरुस्ती / योग्यता प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी विमा, विविध प्रकारची फी, गाडी दुरुस्ती इत्यादी खर्च कसाबसा करावा लागतो. त्यामुळे तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेणे मागे/पुढे होते, परंतु शासनाने दर दिवसाला 50 रुपये दंडाची पठाणी वसुली करत आहे. हा दंड अन्यायकारक आहे. मोठ-मोठ्या शहरात रिक्षा चालकांचे दर आणि छोटे शहर, ग्रामीण भागातील रिक्षा भाडे यात मोठी तफवत असते. त्यामुळे सरसकट सर्वांना एकाच नियमाने दंड आकारणे योग्य नाही. रिक्षा चालक कसेतरी करुन रिक्षाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेण्यास उशिर झाल्याने एवढा मोठा दंड भरणे अवघड होत आहे. तरी या दिवसाला 50 रुपये दंडाची अट शिथिल करावी. लमसम माफक दंड आकारण्यात यावा. तो भरण्यास सर्व रिक्षा चालक तयार होतील. तरी केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी. सध्या तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षांना ते घेण्यासाठी मुदत मिळावी, त्या मुदतीनंतर उशिरासाठी माफक रक्कम आकारावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे सांगितले.
यावेळी जुनेद बागवान, सय्यद कयुम, सुलेमान शेख, शेख अस्लम, शेख अन्वर, राकेश शिंदे, इरफान पठाण, सलमान शेख, गोरख शिंदे, मारुती लोखंडे, गणेश धनगर, गोरख आंबेकर, रामदास शिंदे, फारुक शेख, अर्शद सय्यद, याकुब शेख, समीर सय्यद, साजिद सय्यद, शेख साजिद, युसूफ शेख, विजय उमाप आदि उपस्थित होते.