आष्टी(प्रतिनिधी) – समाजातील सर्वसामान्य असलेले दलित, शोषित,आणि वंचित या समाज घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा नेता अशी सुरेश धस यांची ओळख असून गेली तीस वर्ष त्यांनी सातत्याने हे काम केले आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले.
आष्टी येथील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई या महायुतीचे उमेदवार सुरेश धस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष माजी सभापती अरुण भैय्या निकाळजे, शिरूर नगरपंचायत चे सभापती अरुण भालेराव, डॉ.नरेंद्र जावळे,सादिक कुरेशी,दीपक निकाळजे, राजू निकाळजे,किशोर अडागळे,बाळासाहेब जावळे आदीसह आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
पुढे बोलताना पप्पू कागदे म्हणाले की,सुरेश धस हे अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीचे नेतृत्व असून आणि तीस वर्षापासून त्यांनी सरपंच पदापासून ते विधानसभा सदस्य आणि राज्यमंत्री पदापर्यंत काम करताना सतत समाजातील दलित शोषित वंचित असलेल्या समाज घटकांचा विकास हेच उद्दिष्ट समोर ठेवले त्यामुळेच ते राजकारणामध्ये यशस्वी झाले असून गेली 30 वर्षापासून त्यांनी चांगले काम केल्यामुळे त्यांची सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे राजकारण करत असताना त्यांनी या समाज घटकांना घरकुले वैयक्तिक नावाच्या योजना आणि महत्त्वाचे म्हणजे भूमिहीन समाज घटकाला गायरान जमिनी वरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी त्यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.अशा या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वांनी त्यांच्या मागे आपली ताकद उभी करावी असे आवाहनही त्यांनी शेवटी केले .
यावेळी बोलताना आष्टी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई आठवले गट या माहितीचे उमेदवार सुरेश धस म्हणाले की पन्नास वर्षांपूर्वी माझे वडील रामचंद्र धस दादा यांनी जामगाव येथील विहीर दलित समाजाला खुली करून देऊन सामाजिक मध्ये चे उदाहरण घालून दिले आहे त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीमध्ये सतत या दलित शोषित आणि वंचित घटकांमध्ये सतत संपर्क ठेवला त्यांच्या या सामाजिक कार्याचा वसा आपण पुढे नेत असून माझ्या राजकीय यशामध्ये या सर्वसामान्य दीनदलित शोषित आणि वंचित जनतेचा मोठा वाटा आहे या भूमिहीन समाजाने गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सतत प्रयत्नशील आहे आणि या पुढे देखील या कामी सतत प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.