सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी एपीआय शामकुमार डोंगरे यांनी पाडली पार .
अंमळनेर (सुनिल आढाव ) पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत येत असणाऱ्या सावरगाव घाट येथे शुक्रवारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे .यावेळी दसरा मेळाव्या निमीत्ताने उपस्थित पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना सक्त सुचना देखील अप्पर पोलीस अधिक्षक लांजेवार यांनी दिलेल्या आहेत.
सावरगाव येथे दसरा मेळावा मोठ्या प्रमाणावर भरत असतो या दिवशी या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
दसरा मेळाव्याच्या ठिकाणी 33 पोलीस अधिकारी ,182 पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी 52 तर होमगार्ड 83 यांची नेमणूक करण्यात आलेली असल्याची माहिती डीवायएसपी विजय लगारे सह अंमळनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक व सध्याचे अप्पर पोलीस अधिक्षक वाचक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे व पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील व अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांनी दिली.
सावरगाव या दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने बीड पोलीस दलाने तगडा बंदोबस्त जागोजागी तैनात केला आहे व्हीआयपी बंदोबस्त ,स्टेश बंदोबस्त ,पार्किंग बंदोबस्त ,रोड बंदोबस्त ,सह आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त रहाणार आहे.
सावरगाव येथे भव्य दिव्य असा दसरा मेळावा भरणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य ति खबरदारी घेण्याच्या सक्त सुचना देखील अप्पर पोलीस अधिकक्षक लांजेवार यांनी दिलेल्या आहेत .
दसरा मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी अंमळनेर ,पाटोदा ,शिरुर ,आष्टी ,अंभोरा यासह बीड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक हि दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने सावरगाव घाट येथे करण्यात आली आहे.
———–
अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील सावरगाव येथे दसरा मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेता बीड पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे अप्पर पोलीस अधिक्षक लांजेवार साहेब यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणी येऊन उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य ति खबरदारी घेण्याच्या सक्त सुचना दिलेल्या आहेत.
——–
अंमळनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांना सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्या निमीत्ताने होणारी गर्दीचा अनुभव असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरच सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याच्या बंदोबस्तात तैनात करण्याची जबाबदारी सोपवली होती.