दादा चौधरी मराठी शाळेत विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल-प्रा.शिरीष मोडक
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
दादा चौधरी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल दिसत आहे.विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.विद्यार्थ्यांना खेळणी व स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे.तसेच शालेय सुविधा उपलब्ध व्हावेत.यासाठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी व मुख्याध्यापक सुभाष येवले हे सतत प्रयत्नशील आहेत.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन यश मिळवावे.दादा चौधरी मराठी शाळेने कात टाकली आहे.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले आहे.
हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा,दादा चौधरी मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे,मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख रूपाली वाळुंजकर,दिलीप परसपाटकी,प्रिया अहिरे,वैशाली डफळ,शितल पवार,मंगल पवार,अर्चना वाघचौरे,भारतीताई आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सुमतीलाल कोठारी म्हणाले,प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक्सलंट ओलंपियाड स्पर्धा व मंथन परीक्षा,स्टुडन्ट टॅलेंट सर्च परीक्षा,वक्तृत्व स्पर्धा अशा विविध शालाबाह्य स्पर्धेत भाग घेऊन उत्तम यश मिळविले आहे.प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मागे राहू नये.यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी व योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परसपाटकी यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुभाष येवले यांनी केले.तर आभार प्रिया अहिरे यांनी मानले .