अहमदनगर प्रतिनिधी – मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचा साखरपुडा १ डिसेंबर रोजी व शुभविवाह २४ डिसेंबर रोजी शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी बुऱ्हानगर येथील कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभविवाह निमित्त अक्षय कर्डिले यांना आशीर्वाद दिले.
यावेळी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले,गोविंद वाघ,दत्ता तापकिरे,राम पानमळकर,रवी कर्डीले,जालिंदर जाधव,श्रीधर कर्डिले,श्रीधर पानसरे, सुदाम कर्डिले,महादेव जाधव, काशिनाथ हापसे,भाऊसाहेब कर्डिले, नितीन वाघ,निवृत्ती कर्डिले, विजय अमोल धाडगे,सोमनाथ वामन आदी उपस्थित होते.