अहमदनगर (प्रतिनिधी) –
माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने देडगाव, माका, पाचुंदा व हिवरे (ता. नेवासा) या चार गावचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्या पावण गणपती मंदिर परिसरात 111 वडाची झाडे व 50 फुलझाडांचे रोपण करण्यात आले. ह.भ.प. बोरुडे महाराज, ह.भ.प. पांडूरंग घुले महाराज, देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, माकाचे सरपंच नाथाभाऊ घुले, पाचुंदाचे सरपंच कारभारी टकले, हिवरे गावचे सरपंच सिमन जाधव, कोल्हारचे सरपंच शिवाजी पालवे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले.
ह.भ.प. पांडूरंग घुले महाराज म्हणाले की, देशाचे रक्षण करुन सेवानिवृत्त झालेले सैनिक पर्यावरण रक्षणाचे कर्तव्य बजावत आहे. माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. संपुर्ण जिल्ह्यात त्यांचे सुरु असलेले वृक्षरोपण व संवर्धनाचा कार्यक्रम दिशादर्शक आहे. पावण गणपती मंदिर परिसर हिरवाईने सजणार असून, भक्तांना सावली व प्रसन्न वातावरण निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेजर शिवाजी पठाडे यांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या माध्यमातून डोंगररांगा, रस्ते हिरवाईने फुलविण्यासाठी सुरु असलेल्या वृक्षरोपण अभियानाची माहिती दिली.
वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी आधार प्रतिष्ठानचे जयवंत मोटे, चेअरमन शरद बोरूडे, अनिल घुले, दिनकर डमाळे, देवस्थानचे संभाजी मुंगसे, अण्णासाहेब केदार, मुळा कारखानाचे संचालक आबा पांढरे, एकनाथ जगताप, किसनराव भानगुडे, पोलीस पाटील बबनराव भानगुडे, सरपंच कोकाटे गुरूजी, एकनाथ भुजबळ, अमोल पालवे, सुधार महाराज सानप, प्रमोद वाघमोडे, संदिप आदमने, मोतीलाल आदमने, संभाजी तुरकणे, योगेश दहातोंडे, माऊली गोयकर, अमोल मुंगसे, नवनाथ माने, संतोष फुलार, नवनाथ मुंगसे, सय्यद अन्वर, विनोद पठाण, राजू देवकाते, हरिभाऊ मुंगसे, विठ्ठल क्षिरसागर, मधुकर क्षिरसागर, सावंत सर, भास्कर गोयकर, सोया देवकाते, अॅड. अरूण पालवे, विष्णु गिते, भगवानराव गंगावणे, जय हिंदचे शिवाजी पालवे, जय हिंद वृक्षबँकचे संचालक शिवाजी गर्जे, शिवाजी पठाडे, राजू कदम, ज्ञानेश्वर औटी, गोकुळ चोपडे, शिवाजी शिंगटे, पांडूरंग वाघमोडे, राजू आखाडे, कृष्णा होंडे, ज्ञानेश्वर गोफणे, भाऊसाहेब फुलारी, हरिभाऊ होंडे, मुरलीधर दहातोंडे, राजेंद्र लाड, संभाजी पठाडे, दत्तात्रय कुटे आदी उपस्थित होते. आभार राजू कदम यांनी मानले.