अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा लवकरच बॉलीवुड मध्ये झळकणार आहे. घोडेगाव (ता. नेवासा) येथील भारत यल्लाप्पा फुलमाळी याने मराठी चित्रपट आधारवड व हिंदी प्लेज टू प्रोटेक्ट या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी आधारवड मराठी चित्रपटाचे प्रोडूसर राजकुमार अनसाटे, डायरेक्टर सुरेश खाडे व हिंदी प्लेज टू प्रोटेक्टसिने चित्रपटाचे प्रोडूसर अंनतूनी थोमस, डायरेक्टर सुरेश झाडे उपस्थित होते.
सृष्टीतील दिवंगत कलाकार स्व. सदाशिव अमरापूरकर नंतर नगरच्या मातीतला एक कलाकार खलनायकच्या भूमिकेत दिसणार आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या भारत यल्लाप्पा फुलमाळी यांना नाट्य क्षेत्राची आवड होती. यापुर्वी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवुडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली असून, सदर चित्रपटात किन्नरच्या रुपाने त्यांनी खलनायकची भूमिका त्यांनी साकारली आहे. चित्रपटाचे डायरेक्टर सुरेश झाडे यांनी फुलमाळी या सर्वसामान्य कलाकाराच्या अभिनयाची दखल घेऊन मराठी चित्रपटात संधी दिली होती. तर हिंदी चित्रपटात देखील त्यांच्या रुपाने फुलमाळी यांना संधी मिळाली आहे. प्लेज टू प्रोटेक्ट हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.