नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी नागापुर-बोल्हेगाव परिसराला आपले कुटुंब समजून लावले विकासाचे प्रश्न मार्गी

- Advertisement -

रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसीच्या विस्तारीकरणाची गरज – आ.संग्राम जगताप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

विकास कामे करीत असताना शहराच्या पुढील पन्नास वर्षाचा विचार करून कामे सुरू केली आहेत यामध्ये नाट्य संकुल,फेस टू पाणी योजना,मुळा धरणातून दुसरी अमृत पाणी योजना,बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलचे नुतनीकरण,भुयार गटार योजनांच्या कामासह इतर कामे ही सुरू आहेत.रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी एमआयडीसीच्या विस्तारीकरणाचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून काम सुरू आहे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभाग हा आपले कुटुंब समजुन काम करीत असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र.७ मधील सोनचाफा कॉलनी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण सोहळ्या प्रसंगी आ.संग्राम जगताप बोलत होते यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रा .माणिकराव विधाते,नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,साधनाताई बोरूडे,नगरसेवक राजेश कातोरे ,मा.नगरसेवक निखिल वारे,यांच्या उपस्थितीतीत पार पडला.

आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की,शहरांच्या रस्त्याचा प्रश्‍न गंभीर आहे.हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यांचा विकास आराखडा तयार केला आहे.राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून या रस्त्यांसाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देऊ. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासाचा घेतलेला ध्यास गेल्या सात वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामाच्या निधी साठी पाठपुरावा करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.नागापुर-बोल्हेगाव भागातील मूलभूत प्रश्नांपासून कामे करावी लागली आहेत श्री.वाकळे यांनी विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.प्रभागांमध्ये दर्जेदार काँक्रिटीकरणाचे रस्ते बनविणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणले की,महापालिका व आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक सात मध्ये विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत यामध्ये रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण,सभामंडप, पथदिवे,पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन,ओपन स्पेसचे सुशोभीकरण,फेस टू पाणी योजनेच्या अंतर्गत तसेच रमाई व संजय गांधी आवास योजनेचे कामे मार्गी लावली आहेत. प्रभागांमध्ये नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांपासून विकास कामं पर्यंतचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामे करीत असताना याभागतील नागरिकांचे मोठे योगदान आहे.कामामध्ये अग्रेसर राहून माणुसकीचे दर्शन घडविण्याचे काम ते करत असतात,सात वर्षात प्रभागामध्ये नियोजनबद्ध विकास कामे केल्यामुळेच आज ती कामे दिसू लागली आहेत तसेच मनपाच्या आरोग्य केंद्रास अहिल्यादेवी होळकर याचे नाव देण्यात येणार आहे व नागापुर – बोल्हेगाव रस्त्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी भरत थोरात ,हरीशचंद्र लोखंडे ,हारून शेख ,इब्राहिम सय्यद ,अशोक कोऱ्हाळे ,उत्तम जगताप ,महेश जोशी ,ज्ञानेश्वर गुंजकर ,नानासाहेब म्हस्के,बाबुलाल सय्यद ,गोरक्षनाथ तोडमल ,सुधाकर बोंबले,राजेंद्र मडके,विलास जाधव ,भाऊसाहेब वाळुंज,बाळासाहेब नवले ,जयसिंग अडसुळ, काशिनाथ म्हैसमाळे ,गणेश रिसे,दिलिप त्रिभुवन ,उमेश जोशी ,महेश जोशी ,सतिष भगत ,संदिप म्हस्के ,गणेश जाधव ,भिवरराज पारे,सुदाम पारे,रावसाहेब वाटमोडे ,बाळासाहेब वाकळे ,सावळेराम कापडे ,नंदु वाकळे ,विलास वाटमोडे ,बिपीन काटे ,संपत वाकळे ,रमेश वाकळे ,महेश वाकळे ,रोहित वाकळे तसेच प्रभाग क्रं ७ मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles