नगर तालुक्यातील जेऊर बा.येथील पावर हाऊस समोर समन्वय समितीच्या वतीने उपोषण सुरू

- Advertisement -

जेऊर पावरहाऊस विभागाचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा कार्यालयात अधिकाऱ्यांना बसू दिले जाणार नाही – मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर प्रतिनिधी- विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे नगर तालुक्यातील जेऊर व परिसरातील गावाचा विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.केडगाव येथील विद्युत विभागाच्या सबस्टेशन मधून जेऊर येथील पावर हाउस मध्ये वीज पुरवठा केला जातो परंतु याठिकाणी वारंवार नादुरुस्तीमुळे वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे जेऊर याभागती शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे येथे 15 दिवसात या भागाचा विजेचा प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यथा महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना बसू दिले जाणार नाही असा इशारा मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उपोषणकर्त्यांन समोर दिला.

नगर तालुक्यातील जेऊर बा.पावर हाऊस समोर जेऊर परिसरातील समन्वय समितीच्या वतीने उपोषण सुरू केले होते यावेळी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी भेट देऊन बोलत होते यावेळी विनोदसिंग परदेशी,सरपंच अंजना येवले,आणासाहेब मगर,राजेंद्र दारकुंडे,बबनराव आव्हाड,कैलास पठारे,मधुकर मगर,किशोर शिकरे, सोपानराव शिकारे,गणेश आवारे,सुनील पवार,गणेश तवले, विकास कोथंबिरे,संजू येवले,पप्पू येवले,कार्यकारी अभियंता श्री.कोपनर, उद्धव मोकाटे,श्रीतेज पवार,मुसा शेख, राजू तोडमल तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले पुढे म्हणाले की, राज्यामंत्री ऊर्जा व पुनर्वसन मंत्री यांना स्वतःच्या मतदार संघातील प्रश्न मार्गी लावता येत नाही मी मंजूर करून ठेवलेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात मंत्री महोदय धन्यता मानत आहे.राज्यातील पहिला मंत्री असा असेल की जो डीपीचे उद्घाटन ही करत आहे.अतिवृष्टीचे पंचनामे करण्यापेक्षा सरकारने सरसकट शेतकर्‍यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत दयावी तसेच स्वतःच्या मतदार संघातील शेतकऱ्यांना त्या मंत्र्याने मदत मिळवून दयावी असाही टोला मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लावला. तसेच कोरोनाच्या काळामध्ये शेतकरी आर्थिक संकटात असताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे.तरी लवकरात-लवकर जेऊर परिसरातील गावांचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांना महावितरणच्या कार्यालयात बसू दिले जाणार नाही असा इशारा मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिला.

जेऊर समन्वय समितीच्या वतीने जेऊर पावर हाऊस समोर उपोषण करण्यात आले या विविध मागण्या समन्वय समितीच्या वतीने मांडण्यात आल्या यामध्ये केडगाव सबस्टेशन वरून ३३ केव्ही विद्युत पुरवठा होत आहे परंतू वारंवार विद्युत वाहिन्या नादुरुस्त होतात त्यामुळे या विद्युत वाहिन्या दुरुस्त करून पर्यायाने पांढरीच्या पुलाकडूनही विद्युत पुरवठा करावा,पावर हाउस मधील कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे, कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण असावे, रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची निवड करावी तसेच इमामपूर साठी स्वतंत्र विद्युत वाहिन्या टाकाव्यात आदींसह विविध मागण्या समन्वय समितीच्या वतीने मांडण्यात आल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles