द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट !
केडगाव प्रतिनिधी – विक्रम लोखंडे
काष्टी ते बेलवंडी डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत
काष्टी ते बेलवंडी 24 कि .मी. अंतराची चाचणी मंगळवारी (दि 18) रोजी घेण्यात आली लवकरच नगर ते दौड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे . या पुर्ण मार्गात डिझेल इंजीनचा वापर होत आहे .
गेल्या तीन वर्षापासुन नगर ते दौड द्रुतगती ( डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पुर्वि नगर ते मनमाड 4 टप्पा ची चाचणी घेण्यात आली.नगर ते मनमाड मधील 43 कि .मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो . मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता . तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता . तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत . मात्र आता हा पुर्ण मार्ग डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 120 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे . तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे .पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे . मंगळवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते दौड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे
या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेक्शन इंजिनिअर अजय राणा , सेक्शन इंजिनिअर आर डी सिंग ,इंजिनिअर प्रशांत कुमार पुर्ण करण्यात आली
काष्टी ते बेलवंडी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेक्शन इंजिनिअर अजय राणा , सेक्शन इंजिनिअर आर डी सिंग,इंजिनिअर प्रशांत कुमार पुर्ण करण्यात आली