नगर -पुणे महामार्गावरील नेमाने इस्टेट मैदानावर महापुरुषांच्या पुतळ्याचा होतोय अवमान
प्रशासनाचे दुर्लक्ष ; सुरक्षा व्यवस्थाही नाही ; अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण ?
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील नगर – पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकचा रेल्वे ब्रिज उतरल्यानंतर नेमाने इस्टेटचे मैदान आहे. या मैदानाच्या बाजूस म्हणजेच रस्त्याच्या कडेलाच महापुरुषांचा पुतळा आणून ठेवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्षा नाही. सुरक्षा रक्षकही नाही.
जर या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? या ठिकाणी महापुरुषांचा पुतळा आणून ठेवण्याचे नेमके कारण काय आहे? पुतळा परिसरात संबंधित व्यक्तींनी सुरक्षा व्यवस्था का ठेवली नाही? एखादी अप्रिय घटना घडल्यास व त्यातून शहराची शांतता भंग झाल्यास जबाबदार कोण? असे प्रश्न आता नागरीक उपस्थित करत आहेत. महापालिका व पोलिस प्रशासन याची दखल घेणार का? याकडे लक्ष लागले आहे.