नगर मनपा मध्ये आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावा शिवसेना शहर प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) संभाजी कदम यांचं नगरविकास मंत्री यांचेकडे पत्राद्वारे मागणी
नगर – अहमदनगर शहराच्या इतिहासात गुरुवार दि २७ जून हा काळिमा फासणारा दिवस ठरला आहे .याच दिवशी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांना रुपये ९,००,००० /- लाख रुपये लाच घेतानाचे पुरावे मिळाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली आहे . तसेच या घटनेमध्ये कोण-कोण सहभागी आहे त्याच्या तळाशी जाऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची गरजेचे आहे.
पोलिस अधिकारी यांनी आयुक्त यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांचा पदभार महानगर पालिकेतील दुसरे कोणत्याही कनिष्ठ अधिकारी यांच्याकडे न देता ,तो सरळ जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावा .तसेच आयुक्त जावळे यापूर्वी देखील नगरमध्ये उपायुक्त असताना त्यांना पुन्हा नगरमध्येच आयुक्तपदाचा कसा पदभार दिला जातो .याची देखील चोकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी नगर विकास मंत्री यांचेकडे संभाजी कदम यांनी केली आहे.
- Advertisement -