नगर – मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पाअंतर्गत अंकाई किल्ला ते मनमाड चवथ्या टप्प्याची मंगळवारी चाचणी यशस्वी

- Advertisement -

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट !

अहमदनगर प्रतिनिधी : विक्रम लोखंडे

नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत अंकाई किल्ला ते मनमाड या ८ कि.मी. अंतराची चाचणी मंगळवारी घेण्यात आली लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे.या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे.

गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती ( डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.या पुर्वि कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता मंगळवारी ( दि.२८) रोजी अंकाई किल्ला ते मनमाड या ८ कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली.आता ऐकूण ४३ की मी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार,यांनी दिली.

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता.तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत.मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे.तसेच या कामामुळे रेल्वे ताशी १२० प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे.तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे.पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे.मंगळवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे.

या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेकंशन सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार,इंजिनिअर सुद्धांसू कुमार, पुर्ण करण्यात आली.

अंकाई किल्ला ते मनमाड द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेकंशन सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार,इंजिनिअर सुद्धांसू कुमार,एक्झिकेटीव इंजिनिअर व आदी उपस्थित होते.

या चाचणीसाठी कॉन्ट्रॅक्टर एस.ए.यादव,व त्याचे सहकारी , तुलसीदास बिराजदार, सुनिल हेगडे,,प्रताप शेटे,दीपक येवले, सूरज लोहकने, वैभव क्षिरसागर, शुभम लांडे,राहुल जाधव,सुरेश वाघमारे,, सूरज लोहकणे, शिवा कोणे,अमोल मुळे , किरण आहेर ,आदींनी परिश्रम घेतले.

” मनमाड ते नगर डबल लाईन ( द्रुतगती ) रेल्वे मार्गाच्या चवथ्या टप्प्याची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे.या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असुन नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल.असे उपमुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी सांगितले.
.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles