नगर शहर विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांची नेप्ती नाका शिवसेना शाखेस भेट
शिवसेना शाखांना ताकद देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन करु – विलास घोगरे
नगर – शिवसैनिक हा नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेत असतो. प्रत्येक भागातील शाखेच्या माध्यमातून शिवसेनेची खर्या अर्थाने बांधणी होऊन, संघटना मजबूत होत आहे. त्यामुळे अशा शाखांना ताकद देण्याचे काम वरिष्ठ पातळीवर करण्यात येत आहे. नगरमध्ये शिवसेनेचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे, अनेक शाखांच्या माध्यमातून संघटन सुरु आहे. नेप्ती नाका चौक येथील शिवसेना शाखेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी चांगला पुढाकार घेत आहे, त्याचप्रमाणे विविध उपक्रमांतून नागरिकांना दिलासा देत आहेत. उपशहर प्रमुख संदिप दातरंगे यांनी युवकांचे चांगले संघटन निर्माण केले आहे. अशीच जनसेवा करत रहावी, असे आवाहन नगरशहर विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे केले.
शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा समन्वय संपर्कप्रमुख विलास घोगरे अहिल्यानगर येथे आले आस्ता त्यांनी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व शिवसेना शाखा नेप्ती नाका चौक दातरंगे मळा नालेगाव येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, उपशहरप्रमुख संदिप दातरंगे, डॉ श्रीकांत चेमटे, दत्ता दातरंगे, शुभम दातरंगे, सनी आगरकर, गणेश दातरंगे, दत्ता ठाणगे, सचिन धेंड, अविनाश लोंढे, अनिकेत उदारे, आशिष बंदरकर, सार्थक सुडके आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संदिप दातरंगे यांनी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व शिवसेना शाखेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या व सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन संपर्कप्रमुख विलास घोगरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.