साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने मिठाईचे वाटप
अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
कोरोनाच्या महामारीत देखील रस्त्यावरील कचरा प्रभागातील नागरिकांच्या घरातील कचरा नित्यनियमाने उचलून सर्वांचे आरोग्य अबाधित ठेवणारे सफाई कामामुळे प्रभागातील स्वच्छता नांदते,असे प्रतिपादन साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
प्रभाग २ मधील सर्व सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रतिष्ठानने यावर्षीही मिठाईचे वाटप केले, यामध्ये घंटागाडीवरील कर्मचारी, प्रभागातील झाडलोट करणारे कर्मचारी, स्वच्छता निरिक्षक मुकादम यांना श्री.त्र्यंबके यांनी मिठाईचे वाटप करुन त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, किरण कोरे, विजय पानमळकर, निखिल त्र्यंबके, शंतनु जगताप आदि उपस्थित होते.
नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले,कोरोना काळात प्रत्येकजण स्वत:चा जीव वाचविण्यासाठी काळजी घेतांना दिसत होतो.पण नागरिकांच्या सेवेसाठी अत्यावश्यक सेवेत काम करणारे खरे कोरोना योद्धे होते.यामध्ये सफाई कामगारांची भुमिका महत्वाची होती.सर्वत्र स्वच्छता ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. अशा या कष्टकरी घटकांना दुर्लक्षित करुन चालणार नाही. साई-संघर्ष च्या माध्यमातून कोरोना काळातही मदतीचा हात आम्ही सर्वांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्याप्रमाणे त्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दरवर्षी मिठाई वाटप करण्याचे ध्येय व उद्देश आम्ही सफल करतो, असे ते म्हणाले.
यावेळी विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार यांनी देखील आपल्या भाषणातून सफाई कर्मचार्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. स्वच्छता निरिक्षक राजेंद्र सामल, राजू भिसे यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.
यावेळी सफाई कामगार बबई वैराळ सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अश्विनी सोनवणे, विजय चोथे, प्रसाद उमाप, यशवंत घोरपडे, सचिन शिंदे, सुदाम लोखंडे, प्रेम पठारे, विश्वनाथ शिंदे, तसेच महिला नंदा कागोरिया, पुष्पा भालेराव, सुशिला जगधने, सुमन वैराळ, कमल भालेराव, गजरा शेकटकर, गीता दिघे, वेबी जाधव, सविता ससाणे, मंजुषा कलोसिया, शोभा शेकटकर आदि कर्मचारी उपस्थित होते.