नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

- Advertisement -

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर पुणे महामार्गावरील पाटील हॉस्पिटल शेजारी कोठी येथे नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ वडील राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी रेव्ह. सनी मिसाळ, सुधीर शिंदे, शरद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे, राजु देठे, आकाश कोरे, थॉमसन केदारे, संदीप कांबळे, बापू ठोंबरे, थॉमसन पोळ, बाळू ठोंबरे, प्रभुदास गायकवाड, रमाकांत सोनवणे, निखिल साठे, नूतन शिंदे, श्वेता शिंदे, रूपाली शिंदे, निकिता पाडळे, हिरा कांबळे, शकुंतला शिरवाळे, मंदा कसबे, मेघा देवडे, शोभा कांबळे, सुरेखा बर्गे, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र शिंदे म्हणाले की, नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे व विविध समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असणारे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला असून या कार्यालयामार्फत नागरिकांना २४ तास सेवा भेटणार असल्याची भावना व्यक्त केली तर पुढे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे म्हणाले की, नागरिकांचे अनेक समस्या सोडवण्यासाठी मला यश भेटले असून पुढे पण देखील नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी कधीबद्ध राहणार असून नागरिकांना गैरसोय होऊ नये या हेतूने जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला व नागरिकांची कुठलीही समस्या असल्यास सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असून लवकरात लवकर युवकांसाठी नोकरी व रोजगार मेळावा घेणार असल्याची भावना व्यक्त केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles