नाद प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाच्या सरावसत्र व वाद्य पुजनाचा शुभारंभ
ढोल-ताशा पथकास युवा पिढीने पुर्नवैभव प्राप्त करुन दिले – आ.संग्राम जगताप
नगर – पारंपारिक वाद्यही आपल्या संस्कृतिचा भाग आहे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात वाजविण्यात येणारे वाद्यही ठरलेले आहेत. सार्वजनिक उत्सवात महाराष्ट्राची ढोल-ताशांची परंपरा मधल्या काळात लोप पावली होती, परंतु युवा पिढीने त्यास पुर्नवैभव प्राप्त करुन दिले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात ढोल-ताशा पथकांना मागणी वाढली आहे. नगरमध्येही अनेक ढोल-ताशा पथक आहेत, यात ‘नाद प्रतिष्ठान’च्या पथकाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. डॉल्बी, सीडी च्या कर्कश आवाजावर नियंत्रण व ध्वनी प्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे, त्यामुळे आपले पारंपारिक वाद्य हे सुमधूर व तालबद्ध असल्याने त्यातून आनंद मिळतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नाद प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाच्या सरावसत्र व वाद्य पुजनाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राहुल पवार, विशाल पवार, पथक प्रमुख सागर आहेर, केतन खरपुडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सागर आहेर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून ढोल-ताशा पथकाने आपली वेगळीपण जपले आहे. वाद्यतील विविध प्रकारच्या ताल-सुरांची सांगड घालत निर्मिती केली असल्याने अनेकांच्या पसंतीस हे पथक उरतले आहे. नगरसह जिल्ह्यातूनही पथकास मागणी वाढत आहे. या ढोल पथकात अनेक उच्च शिक्षित तर काही नोकरी-व्यवसाय करणारे युवक-युवतीं सहभागी असून, या पथकाच्या माध्यमातून ते आपला छंद जोपासत आहे, असे सांगितले.
याप्रसगी विशाल पवार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नाद ढोल-ताशा पथकाच्या सराव सत्रास प्रारंभ झाला असून, नवनवीन व तालबद्ध ताल-सुरांसह वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. युवक-युवतींची वेषभुषा, ढोल-ताशां आकर्षक कव्हर आदिंसह वाहतुक व्यवस्था, प्रथोमोपचार अशा बारक-सारीक गोष्टींचा विचार करुन हे पथक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले.
प्रास्तविक केतन खरपुडे यांनी केले तर आभार करण आहेर यांनी मानले. प्रतिष्ठानचे पदाधिकारी करण आहेर, करण नाटेकर, रोहित वाघमारे, संदेश लोखंडे, कृष्णा बुलाखे, गणेश मोकाटे, अदित्य दीक्षित, सुरज वाघमोडे, आकाश सोहत्रे आदि उपस्थित होते.