निंबळकचे ग्रामदैवत श्री खंडेरायाची गुरुवारी यात्रा शुकवारी भव्य जंगी हगामा
निंबळकचे ग्रामदैवत श्री खंडेराया यात्रेनिमित्त माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांनी कै. संजय लामखडे व कै.विलास लामखडे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या जंगी हगाम्यात नामवंत पहीलवानानी कुसत्या मधील डावपेज टाकत आखाडा रंगतदार केला. आठ तास हगामा चांगला रंगतदार झाला माधवराव लामखडे गेल्या तीस वर्षापासून स्वखर्चातून हगाम्याचे आयोजन करत आहे.
ग्रामदैवत श्री खंडेरायांची यात्रा सालाबाद प्रमाणे बुद्ध पौर्णिमेस असते. त्यामुळे या वर्षी यात्रा गुरुवार दि.२३ रोजी हगामा २४ रोजी हगाम्याचे आयोजन केले होते. पाचशे रुपायापासून पन्नास हजार रूपया पर्यत कुस्त्या लावण्यात आल्या. कुस्त्या इतक्या रंगतदार झाल्या की प्रेक्षकानी मोठया प्रमाणात बक्षिसाचा वर्षाव केला. जवळपास तीनशे कुस्त्या या वेळी झाल्या.
पंच म्हणून बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब साठे, साहेबराव सप्रे, अजय लामखडे , केतन लामखडे यांनी काम पाहीले. या हगाम्यात महिला पाहिलवानानी मोठया प्रमाणात हजेरी लावली. यावेळी लंके म्हणाले निंबळक चाहगामा राज्यात प्रसिद्ध आहे. माधवराव लामखडे हागाम्याचे उत्कृष्ट नियोजन करतात सर्व मल्लांना त्याचा मेहनता देतात. या हगाम्यासाठी माजी आमदार निलेश लंके माजी जिल्हा परीषद, माधवराव लामखडे ,भाऊराव गायकवाड, संजय गेरंगे, बाळू म्हस्के, दादा भाऊ कळमकर दादा कोतकर, भाऊ गोडसे,दत्ता पाटील सप्रे, , रमाकांत गाडे,, योगीराज गाडे, भाऊराव गायकवाड, बी.एम कोतकर, घनश्याम म्हस्के, विष्णु खोसे, शिवा पाटील होळकर, वसंत पवार, विष्णु खोसे, बाळासाहेब कोतकर, सतीष गवळी या हगान्याचे नियोजन माधवराव लामखडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.