श्रीगोंदा येथील खाकीबुवा ते मांडूळ वाडी फाटा रस्त्याकडे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, पीडब्ल्यूडी अहमदनगर यांच्याकडून जाणून-बुजून काम करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप
निकृष्ट दर्जाचे चालू काम बंद करून उत्तम दर्जेचे काम चालू करण्यात यावे अन्यथा गावकऱ्यांसमवेत आंदोलन करणार- उपसरपंच राम घोडके
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील खांडगाव वडघूल ग्रामपंचायत चे उपसरपंच राम घोडके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की, सन 2021 ला मंजूर झालेले सदर रस्त्याचे काम जुलै 2023 पर्यंत होत नाहीत याला जबाबदार असणारे अधिकारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम अहमदनगर, उपअभियंता डोंगरे व कनिष्ठ अभियंता वराळे यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच सदर रस्त्यावर एका बाजूला खडीचे ढिगारे टाकले आहे व दुसऱ्या बाजूला साईट पट्टीवर काम चालू आहे त्यामुळे या रोडवर अनेक अपघात झालेले आहे तसेच वाहतूक व नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी अडथळे होत आहे.
यात या रोडवर खड्ड्याचे साम्राज्य आहे व विलंब झालेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते यांना सूचना देऊन सुद्धा हे काम मार्गी लागत नाही व कोणताही अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाही. म्हणजेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी व मनमर्जीप्रमाणे काम करत आहे. खाकीबुवा ते मांडूळ वाडी फाटा रस्त्याचे लवकरात लवकर काम करण्याचे सूचना कराव्यात तसेच जाणून बुजून आपल्या स्वतःसाठी कामास विलंब करून नागरिकांना अपघाताला सामोरे जावा लागते याला जबाबदार म्हणून कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, इंजिनिअर यांच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही.
त्यामुळे खांडगाव वडघूल ग्रामपंचायतचे उपसरपंच राम घोडके पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्याचे तिन्ही अधिकारी हे कोणालाही घाबरत नाही असे त्यांचे मत आहे. त्यामुळे आमची तक्रार कुठेही केली तरी काहीच होणार नाही आम्ही करू तीच पूर्व दिशा म्हणूनच यांच्या या मनमर्जी धोरणामुळे नागरिकांना हा त्रास करावा लागत असून हे रस्त्याचे काम लवकरात लवकर झाले नाही तर गावकऱ्यांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे उपसरपंच राम घोडके म्हणाले..