निमगाव वाघात रंगणार पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन
काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंदा साळवे यांची निवड
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा होणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता.नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून, या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूरचे ज्येष्ठ कवी आनंदा साळवे यांची निवड करण्यात आली. कवी साळवे यांचे अनेक पुस्तक प्रकाशित झालेले असून, त्यांना साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पै. डोंगरे यांनी म्हंटले आहे.
या काव्य संमेलनमध्ये जिल्ह्यातील नामवंत कवी व नवोदित कवी सहभागी होणार आहे. तर विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- Advertisement -