मुलांना लहान वयातच गडकिल्ल्यांची ओळख व्हावी : आ.निलेश लंके
अहमदनगर प्रतिनिधी : विक्रम लोखंडे
नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील अवि साठे युवा मंचच्यावतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रसाद सतिश ढवळे याने प्रथम क्रमांक मिळवला. श्रेयस मुठे याने व्दितीय तर सत्यम शेळके याला तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले. बक्षिस वितरण नुकतेच आ.निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योजक अजय लामखडे, भोयरे पठारचे सरपंच राजू आंबेकर, उपसरपंच रावसाहेब शिंदे, पिंपळगाव कौडा चेसरपंच सतीश ढवळे, कामरगावचे मा सरपंच गणेश साठे, नाना डोंगरे ,नानासाहेब आंबेकर ,विकास उरमुडे अशोक शिंदे ,मणेश जरे,राहुल आंबेकर गौरव नरवडे, लहू टकले,पप्पु उरमुडे ,मनोहर गाडे तसेच अवि साठे सर युवा मंचाचे सहकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आमदार लंके म्हणाले की, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची ओळख, त्यांचा इतिहास लहान वयातच मुलांना समजला पाहिजे. त्यादृष्टीने दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यातून मुलांना किल्ल्यांची ओळख व माहिती झाली. स्पर्धेसाठी सुमारे 200 ते 250 मुलांनी भाग घेतला होता.