गावाचा विकास हेच ध्येय – शोभा शिंदे
अहमदनगर(प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शोभा जालिंदर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच सुधाकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुक प्रक्रियेत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी लाला मोहंमद शेख यांनी काम पाहिले. शिंदे यांनी दाखल केलेल्या उपसरपंच पदाच्या अर्जात सुचक म्हणून माजी उपसरपंच शिवाजी होळकर तर अनुमोदक म्हणून संभाजी गडाख हे होते.
माजी उपसरपंच संभाजी गडाख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली.शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच ग्रामपंचायत कार्यालया समोर समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.माजी सरपंच मिराताई जपकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच शोभा शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.
यावेळी माजी सरपंच विठ्ठल जपकर, देवा होले, संजय जपकर, शिवसेना उपतालुका प्रमुख जालिंदर शिंदे, चेअरमन बाळासाहेब जपकर, समता परिषदेचे रामदास फुले, माजी उपसरपंच राजेंद्र होळकर, यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोरख फुले, वंदना कांडेकर, उषा पवार, शितल होळकर, सुलोचना होळकर, हिराबाई कदम, सुनिता आल्हाट, शुभम शिंदे, महेंद्र चौगुले, राहुल गवारे, सोमनाथ व्यवहारे, सबाजी कांडेकर, जावेद सय्यद, गुलाब सय्यद, राजेंद्र शिंदे, अक्षय सप्रे, किरण वाघाडे, योगेश वाघाडे, अमोल जपकर, अनिल पवार, सत्तार सय्यद, एकनाथ जपकर, दादू चौगुले, सुरेश कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच शोभा शिंदे यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून,प्रलंबीत कामे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडण्यासाठी पुढाकार राहणार आहे.गावाचा विकास हेच ध्येय ठेऊन सर्व सदस्य व ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता कार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली.
शिंदे यांच्या निवडीबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, सुभाष जपकर, अरुण होले यांनी अभिनंदन केले.