नेवाशात ७१ वीज चोरांवर कारवाई; ११ लाख ४९ हजाराचा दंड ठोठावला

- Advertisement -

उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांच्या पथकाचे यश : वीज चोरांमध्ये खळबळ

नेवासा फाटा (प्रतिनिधी) – महावितरण नेवासा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तब्बल ७१ वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करुन त्यांना साडे अकरा लाखांचा दंड ठोठावल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेवासा तालुका व परिसरात वीज चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून,वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या नेवासा उपविभागाच्या वतीने नेवासा परिसरात वीज तारांवर आकडे टाकून तसेच मीटरमध्ये घोटाळा करून वीज चोरी करणाऱ्या तब्बल ७१ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने तसेच धोकादायकरित्या आकडे टाकून वीज घेतल्यामुळे हमखास रोहित्रात बिघाड होतात. परिणामी त्याचा इतर ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वीज गळतीमुळे महावितरणच्या अहमदनगर अधीक्षक अभियंता श्री. सुनील काकडे व कार्यकारी अभियंता श्री. लक्ष्मण काकडे यांच्या निर्देशानुसार नेवासा उपकार्यकारी अभियंता श्री. शरद चेचर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहर व ग्रामीण भागात वीज चोरांवर मोठी कारवाई करण्यात आली.

सदरील धडक कारवाईमुळे महावितरणला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होण्याबरोबरच वीज गळती देखील कमी होणार आहे. तालुक्यात यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असून वीज चोरी करणाऱ्यां विरोधात १३५ कलमान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी सांगितले.

महावितरणच्या नेवासा उपविभागांतर्गत असलेल्या टोका फिडरवरील टोका,प्रवरासंगम, टोका, मंगळापुर, खेडले काजळी येथे केलेल्या कारवाईमध्ये 16 मीटर वीज चोरी केसेस, 04 आकडे टाकून वीज चोरी अशा 20 वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून यामध्ये 1 लाख 83 हजार रुपये वीज चोरी दंडाची रक्कम असून 58 हजार रुपयांची तडजोड रक्कम अशी 2 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. नेवासा बुद्रुक फिडरवरील बेलपिंपळगाव येथे केलेल्या कारवाईमध्ये 02 मीटर वीज चोरी केसेस, 16 आकडे टाकून वीज चोरी आशा 18 वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून यामध्ये 3 लाख 8 हजार रुपये वीज चोरी दंडाची रक्कम असून 53 हजार रुपयांची तडजोड रक्कम अशी 3 लाख 61 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तर नेवासा शहरात केलेल्या कारवाईत पाच मीटर वीज चोरी केसेस, २८ आकडे टाकून वीज चोरी आशा ३३ वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून यामध्ये 4 लाख 45 हजार रुपये वीज चोरी दंडाची रक्कम असून 66 हजार रुपयांची तडजोड रक्कम अशी 11 लाख 49 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. सदर कारवाई मध्ये एकूण 71 ग्राहकांवर एकूण 74,284 युनिट करिता 54.088 kw लोडसाठी एकूण 9 लाख 67 हजार दंड व तडजोड रक्कम 1 लाख 82 हजार असा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता श्री. शरद चेचर यांनी सांगितले.

वीज चोरी विरोधातील या मोहिमेत सहायक अभियंता अमोल मालुंजकर, विजयसिंह पाटील, किशोर कायस्थ, मनोहर पाटील, उमेश खारवे, घनशाम काळे यांच्यासह वीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles