पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.अर्चना काळे व व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय डोळसे
पतसंस्थेच्या विविध योजनांच्या माध्यमातून उत्तुंग भरारी -अर्चना काळे
नगर – पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.अर्चना सागर काळे व व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय लक्ष्मण डोळसे यांची निवड झाल्यानंतर पतसंस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक किरण धारक, मनोज क्षीरसागर, निशिकांत शिंदे, प्रसाद शिंदे, बाळासाहेब हुच्चे, संजय धोकरिया, आशा चौरे, अभय काळे, सागर काळे दिपक भागवत, कविता डोळसे, अमृता शिंदे आदि उपस्थित होते.
निवडीनंतर बोलतांना नूतन चेअरमन सौ.अर्चना काळे म्हणाल्या, पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांच्या एकत्रित प्रयत्नाने आज पतसंस्था प्रगती पथावर आहे. पतसंस्थेच्या विविध योजनांच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेत सर्वसामान्य, उद्योजक यांना माफक दरात कर्ज उपलब्ध करुन देत त्यांची प्रगती साधली जात आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन ठेवीदारांना आकर्षक व्याजदर मिळत आहे. पतसंस्थेच्या चांगल्या कारभारामुळे सर्वांचा दिवसेंदिवस विश्वास वाढत आहे. सर्वांच्या सहकार्याने आपल्यावर चेअरमनपदाची जबाबदारी सोपवली, ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी व्हाईस चेअरमन दत्रात्रय डोळसे म्हणाले, पतसंस्था आपली आहे या भावनेतून प्रत्येकजण काम करत आहे, त्यामुळे पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे सुरु आहे. प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा होत आहे. ग्राहक, सभासद, ठेवीदार यांच्या समन्वयातून पतसंस्थेचा लौकिकात वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले.
याप्रसंगी प्रसाद शिंदे पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन मनोज क्षीरसागर यांनी केले तर आभार बाळासाहेब हुच्चे यांनी मानले. नूतन चेअरमन अर्चना काळे व व्हाईस चेअरमन दत्तात्रय डोळसे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
- Advertisement -