पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल केडगावात पोपट पवार यांचे जंगी स्वागत

- Advertisement -

बालपणीच्या आठवणी झाल्या ताज्या

पोपट पवार यांचे कार्य युवकांना दिशादर्शक – नगरसेवक राहुल कांबळे

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या वतीने समाजसेवेतील पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपट पवार यांचे केडगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले.पद्मश्री पुरस्कार घेऊन परत येत असताना केडगाव वेस येथे त्यांचा ढोल,ताशाच्या गजरात व आतषबाजीने स्वागत करण्यात आले.बालपण गेलेल्या केडगावात आगमन झाल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.तर वर्ग मित्रांच्याही भेटीगाठी त्यांनी घेतल्या.या स्वागत कार्यक्रमाने पवार भारावले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांचा केडगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी आरपीआयचे शहर युवक अध्यक्ष तथा नगरसेवक राहुल कांबळे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्याम कोतकर, संतोष गायकवाड, नगरसेवक गणेश नन्नवरे, संजय कांबळे, दिपक गायकवाड, केतन कांबळे, अनिल कांबळे, विशाल कांबळे, राहुल कोतकर, दिपक कांबळे, सागर धस, सचिन सरोदे, सुजित मगर, करण पाचारणे,प्रविण पाचारणे,अशोक कांबळे, सतीश पाचारणे,अभिषेक शिरवाळ, विनोद गायकवाड, जॉकी काकडे, सागर धस आदी उपस्थित होते.

नगरसेवक राहुल कांबळे म्हणाले की,पोपट पवार यांचे केडगावशी जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे.त्यांचे बालपण केडगावमध्ये गेले.त्यांना पद्मश्री मिळाल्याने केडगावसह अहमदनगर जिल्ह्याची मान उंचावली आहे. हिवरेबाजार गावाचा कायापालट करुन त्यांनी गावाला देशाच्या नकाशावर आनले.गावातील जलसंधारण, मृदा संधारण व वनसंधारण कामात स्वत:ला झोकून गाव पाणीदार बनवले. त्यांचे कार्य युवकांना प्रेरणा देणारे असून, सक्षम भारतासाठी त्यांचे कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles