पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याला महत्त्वाची पदे

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या प्रेसिडेंटपदी नितीन डोंगरे व जॉइंट सेक्रेटरीपदी आनंद लहामगे

पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याला महत्त्वाची पदे

अहमदनगर (प्रतिनिधी) – उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या प्रेसिडेंटपदी कोपरगावचे कर सल्लागार नितीन डोंगरे व जॉइंट सेक्रेटरीपदी नगर शहरातील कर सल्लागार आनंद लहामगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतीच असोसिएशनची बैठक पार पडली. यामध्ये संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी नुतन कार्यकारिणी जाहीर केली. पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याला महत्त्वाची पदे देण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या माध्यमातून सीए, टॅक्स कन्सल्टंट, टॅक्स ॲडव्होकेट व प्रमाणित लेखापरीक्षक यांचा समावेश आहे. या असोसिएशन तर्फे मागील तीन वर्षापासून राज्यस्तरीय कर परिषद नाशिक येथे आयोजित केली जाते. यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भ, मराठवाडा येथील सदस्यांचा समावेश असतो. नुकतेच झालेल्या राज्यस्तरीय कर परिषदेत इतर राज्यातून देखील सीए, टॅक्स कन्सल्टंट, टॅक्स ॲडव्होकेट व लेखापरीक्षक सहभागी झाले होते. नुकतेच पार पडलेल्या असोसिएशनच्या बैठकीत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या माध्यमातून विविध कार्यशाळा, परिषद, वेबिनारचे आयोजन करून करदात्यांच्या अंमलबजावणी मधील अडचणीवर योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याची भावना प्रेसिडेंट नितीन डोंगरे यांनी व्यक्त केली. संघटनेच्या माध्यमातून सीए, टॅक्स कन्सल्टंट, टॅक्स ॲडव्होकेट व प्रमाणित लेखापरीक्षक यांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सगळ्यांना संघटित करुन व नवीन कर सल्लागार आणि प्रॅक्टिशनर्स यांच्यासाठी भविष्यातील अडी-अडचणीवर मात करण्यासंदर्भात जागरुकता निर्माण केली जाणार असल्याचे जॉइंट सेक्रेटरी आनंद लहामगे यांनी म्हंटले आहे.

सभासदांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर विषयी ज्ञान व करदात्यांना जागृत करण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे. दर महिन्याला वेबीनारच्या माध्यमातून कर संदर्भात विविध विषयावर तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजन केले जाते. तर केंद्र शासनाचे कर विषयी नवीन धोरण, सुधारणा, कायदे याबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे अद्यावत ज्ञान प्राप्त होऊन कर दात्यांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे काम होत आहे. नवनिर्वाचित प्रेसिडेंट डोंगरे व जॉइंट सेक्रेटरी लहामगे यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles